फ्रीडम रायडर बाईक रॅलीचे भंडाºयात जोरदार स्वागत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : फिट इंडिया फ्रीडम रायडर बाईक रॅली भारत भ्रमंतीवर निघाली आहे. दरम्यान या रॅलीचे भंडारा येथे आगमन झाले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांच्यासह भाजप पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रॅलीतील बाईकस्वारांचे जोरदार स्वागत केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते फिट इंडिया फ्रीडम रायडर बाईक रॅलीला हिरवी झेंडी देण्यात आली आहे. ही रॅली संपूर्ण भारतभर सदृढ आरोग्य व फिट इंडियाचा संदेश पसरवित आहे. सदर रॅलीमध्ये ७५ मोटरसायकलवर १२० बाईकस्वार सहभागी झाले आहेत. यामध्ये दहा महिलांचा देखील समावेश आहे. हे ७५ मोटरसायकल ७५ दिवसात सहा आंतरराष्ट्रीय सीमांसह ३४ राज्यांमधून २५० जिल्ह्यातून भ्रमंती करीत १८ हजार किलोमीटर अंतर प्रवास करणार आहे. भारत भ्रमंती दरम्यान ही रॅली भंडारा जिल्ह्यात पोहोचली. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी स्वत: उपस्थित राहून रॅलीचे स्वागत केले. प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात बाईकस्वारांना विसावा देण्यात आला. यावेळी यावेळी त्यांना पुष्प देऊन व माल्यापर्ण करून पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रसंगी हॉकी असोसिएशनच्या खेळाडूंनीही बाईकस्वारांचे स्वागत करून त्यांच्या उत्साह वाढविला. यावेळी भाजपचे मयूर बिसेन, विकास मदनकर, सूर्यकांत ईलमे, मुन्ना नागोरी यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तथा खेळाडू उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *