नवीन रेल्वे लाईनसाठी माती परीक्षण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नवीन ईस्ट कोस्ट डीएफसीने देशातील माल वाहतुकीच्या कार्यात बदल घडवून आणण्यासाठी कॉरीडोर उभारण्याचे काम हाती घेतले आहे. रेल्वेच्या सहकार्याने नागपूर-रायपूर या लोहमार्गावर न्यू ईस्ट कोस्ट डेडिकेटेड फ्रेड कॉरीडोर (ईसीडीएफबी) या प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. या बाबीची अंमलबजावणी एक महिन्यापूर्वी करण्यात आली. मात्र, अवघ्या महिनाभरातच पुन्हा जवळपास ३०० यंत्राच्या माध्यमातून करडी, मुंढरी, कान्हाळगाव परिसरातील गावांमध्ये तसेच जवळच्या तिरोडा तालुक्यात माती परिक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले. या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रेल्वेच्या भूमिकेबाबत परिसरातील शेतकºयांमध्ये भूमिहिन होण्याची भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीच्या युनिट खर्चात कपात करणे आणि अधिक वेगाने जड आणि लांब गाड्या या कॉरिडोअरच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहेत. नवीन ईस्ट कोस्ट डीएफसी देशातील माल वाहतुकीच्या कार्यात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून डीएफसीने माल वाहतुकीसाठी एक समर्थित रेल्वे कॉरीडोर उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी मुंबई – नागपूर – रायपूर- हावडा या मार्गावरील जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याची निवड करण्यात आली. या मार्गिकेच्या बांधकामासाठी करडी परिसरात माती परीक्षण करण्यात आले आहे.

हा प्रकल्प उभारणीसाठी हैदराबाद येथील एका कंपनीला डीपीआर तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आले. दरम्यान, संबंधित कंपनीकडून डीपीआरनुसार महिनाभरापूर्वी तालुक्यातील करडी, कान्हाळगाव, मुंढरी, कान्हाळगाव परिस- रातील गावे तसेच तिरोडा तालुक्यातील गराडा, मलपूरी यासह अनेक गावात लोहमार्गाकरिता जमिनीची पाहणी करण्यात आली. याकरीता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकºयांना नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या प्रकल्पाची उभारणी होणार की नाही? याबाबत संभ्रम असल्याने तुर्त शेतकºयांमधील भीती शमली. मात्र, अवघ्या महिन्यातच प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरूवात झाल्याचे अनुभवास येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून यंत्रांच्या माध्यमातून गावागावातील माती परिक्षण केले जात आहे. असे असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबत कोणतीही माहिती पुरविण्यात आली नाही. एकंदरीत या प्रकल्पाअंतर्गत येणाºया स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासनही अनभिज्ञच आहेत. दुसरीकडे हे काम प्रगतीपथावरअसल्यामुळे शेतकºयांमध्ये भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *