परतीच्या पावसाने वाढविल्या शेतकºयांच्या चिंता

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन हद्दीत निलज बु. व परिसरात मंगळवार दि.१० आॅक्टोबर २०२२ दुपारनंतर आभाळ भरून आले. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास धो-धो पावसाच्या सरी बरसल्या. सोबतच विजांचा कडकडाट व सोसाट्याचे वारेही वाहत होते. सध्या पावसाळा आटोपत असून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतकºयांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. ग्रामीण भागातील शेतकºयांचे जीवनमान शेतीच्या भरवशावर अवलंबून आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेत शिवारात भात पिकाची लागवड केली जाते. हलक्या प्रतीच्या धान पिकासाठी जमीन सुपीक असल्याने जास्त प्रमाणात हलक्या प्रतीच्या वाणाचे उत्पादन घेतले जाते. सध्या शेत शिवारातील काही बांध्यातील लोंबीवर आलेले हलक्या प्रतीचे धान पीक कापणीसाठी तयार होत आहे. मात्र,अधून-मधून दमदार पाऊस येत असल्याने हलके धान पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात पावसाने कहरच केला. शेत शिवारात बांध्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूपआले होते. संततधार पावसामुळे पिके पाण्याखाली आली होती. मात्र,तरीही जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या बळीराजाने कसेबसे धानपीक उभे केले. आता हलक्या वाणाचे धान कापणीला येत असताना परतीच्या पावसाचे संकट घोंगावत आहे. परिणामी, परतीचा पाऊस हाता तोंडाशी आलेला घास हिरावून तर घेणार नाही ना? अशी भीती आता शेतकºयांना सतावत आहे.

ऊन पावसाचा खेळ
परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरीही गत सप्ताहापासून कधी ऊन, तर कधी सावली तर कधी पाऊस अशा प्रकारे ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. सोमवारी दुपारनंतर चार वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. परतीच्या पावसाचा खेळ संपेपर्यंत शेतकºयांचा जीव मुठीत राहणार आहे. मोहाडीत दुपारी ४.४५ वाजता मुसळधार पाऊस सूरवात झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *