राष्ट्रीय टारगेट बॉल स्पर्धेत गांधी विद्यालय पहेला येथील खेळाडूंना सुवर्णपदक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी वाकेश्वर : हरियाणा (जसिया ) या ठिकाणी पार पडलेल्या दि.२४ ते २८ जून २०२३ ला राष्ट्रीय टारगेट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ सहभाग घेतला होता. ह्या महाराष्ट्र संघाचे टारगेट बॉल स्पर्धेत गांधी विद्यालय पहेला येथील खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. विद्यालयातील नियमीत सरावामूळे विद्यार्थ्यी खेळाडूंनी सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन केलेत. व महाराष्ट राज्याला राष्ट्रीय स्तरावरीलसुवर्ण पदक प्राप्त करून दिलेल. त्याच्या अथक प्रयत्नामुळे महाराष्ट्र राज्य व जिल्ह्याचा नाव उज्ज्वल झाला. तर विद्यालयाच्या किर्तीत मानाचा तुरा रोवल्या गेला. या यशस्वी गुणवंत खेळाडूंचे सगळीकडे अभिनंदन आणि कौतूक होत.

महाराष्ट्र टारगेट बॉल असोसिएशनचे सचिव उत्तम उगाडे, भंडारा जिल्हा अध्यक्ष डॉ. सिंग, प्रशिक्षक डी. बी. टेकाम, सहसचिव अरविंद चौरे यांनी त्यांचे अभिनंदन केलेल.तसेच गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड.आनंद जिभकाटे, संस्था सचिव रामदास शहारे, संस्थाउपाध्यक्ष नरेद्र कावडे, सहसचिव सुदाम खंडाईत, सर्व संस्था विश्वस्त मंडळ, प्राचार्य डी.जी. काटेखाये, वाय.एन. काटेखाये, प्रा. एस.व्ही. गोंडाणे, प्रा.व्ही.एल.हटवार, प्रा. एस. एस. भूरे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.