मतदार पडताळणीसाठी बीएलओ यांना सहकार्य करण्याचे आवाहन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन बीएलओ मतदार पडताळणी करीत आहेत. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार लाखनी दत्तात्रय निंबाळकर यांनी याबाबत बीएलओंची सभा घेतली. बीएलओ प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन मतदारांचे आधार नंबर, मोबाइल नंबर अद्यावत करणे, मतदार यादीतील नाव, फोटो, पत्ता दुरुस्तीसाठी अर्जदाराकडून नमुना ८ फार्म भरून घेणे, दिव्यांग मतदारांची अद्यावत यादी तयार करून दिव्यांग मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये चिन्हाकित करणे, यासाठी दिव्यांग मतदारांचे फार्म भरून घेणे, व्हीआयपी मतदार व गावातील इतर प्रतिष्ठीत मतदारांचे नाव मतदार यादीत असल्याची खत्री करणे, चुकीने नाव डिलीट झाले असल्यास नमुना ६ भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

गोपाळा समाज, पिंपळगाव ता. लाखनी येथील तांडा येथे जावून नमुना ६ नंबरचे अर्ज देवून सर्वांना मतदार यादीत समावेश करण्यासाठी भेट दिली. यांचा येथे रहिवास आहे पण, यांच्याकडे रहिवास पुरावा नाही. परंतु यांचा सर्वसाधारण रहिवास या तांड्यावर आहे. बीएलओंना या प्रशिक्षणामध्ये अ‍ॅपमध्ये कसे काम करावयाचे आहे याचेसुद्धा प्रशिक्षण देण्यात आले. राजकिय पक्षाची देखील बैठक घेण्यात आली आहे. २१ आॅगस्टपर्यत बीएलओ यांना घरोघरी भेटी देऊन बीएलओ अ‍ॅपद्वारे मतदार यादीतील मय्यत दुबार, स्थलांतरित मतदार वगळणे, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे, ब्लर फोटो गोळा करणे, नवीन मतदार नोंदणी, प्रतिष्ठीत व्यक्तींची तपासणी करुन मतदार यादी अद्यावत करावयाची आहे. त्याकरीता सर्व नागरिकांनी बीएलओ यांना सहकार्य करण्याचे आवाहन लाखनीचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर तसेच नायब तहसीलदार डी.ए.उरकुडकर, संजय राघोर्ते यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.