सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय रद्द करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांवर सेवा निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्त करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत अन्यायकारक असून हा निर्णय रद्द करावा, या मागणीला घेऊन संविधान मैत्री संघ, युवा ग्रॅज्युएट फोरम, सर्वसमाज विचार मंचासह विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या वतीने जिल्ह्यातील आठही तालुका मुह्ययालयावर निदर्शने आंदोलन २६ जुलै रोजी करण्यात आले. यावेळी प्राधिकृत अधिकाºयांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात सेवानिवृत्त शिक्ष्- ाकांना जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी नेमणुका देऊ नये, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची नोंदणी प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, रिक्त पदांच्या ८० टक्के शिक्षक पदभरती करावी, विभागीय भरती नियमित गुणवत्ता यादी लावण्या ऐवजी केंद्रीय पद्धतीने गुणवत्ता यादी लावावी, प्रतीक्षा यादी लावण्यात यावी, सर्वच प्रवर्गाचे अनुशेष भरून त्या प्रवर्गातील जागा अतिरिक्त असतील त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आदी मागण्यांचा समावेश आहे. गोंदिया येथे प्रशासकीय इमारत डॉ. आंबेडकर चौक परिसरात निदर्शने करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. यावेळी अतुल सतदेवे, उमेश कटरे, वसंत गवळी, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, उमेश दमाहे, नितेश उदापुरे, हितेश सिंगनजुडे, मुकुंद परिहार, निहाल बिसेन, रस्मी येसनसुरे, हंसा बावनकर, आकाश कोल्हे, भेजेंद्र तुरकर, रमा चुटे, मृणाली खांडेकर, हीना बोपचे, लता पारधी, रविकांता बिसेन, शोभा ठाकरे, पंकज ठाकरे, छत्रपाल रहांगडाले, उमेश पटले, नंदकिशोर पटले, विजय पारधी, विनय हिरकने, चित्रसेन गौतम उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *