उद्या लाखनीत मंडल यात्रा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी, राज्यस- रकारने ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह लवकर सुरू करावे व मंडल आयोगाच्या पूर्ण शिफारसी लागू कराव्यात यासाठी पूर्व विदर्भात मंडल यात्रा निघाली असून ही यात्रा ६ आॅगस्टला लाखनीत येत आहे. ७ आॅगस्ट १९९० ओबीसींना अधिकार देणारा मंडल आयोग लागू झाला. या दिनाचे औचित्य ओबीसी समाजात मंडल आयोगा विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने ही मंडल यात्रा विदर्भातील ७ जिल्ह्यात ३० जुलै ते ६ आॅगस्ट २०२३ पर्यंत ही यात्रा पूर्व विदर्भात फिरणार आहे. केंद्र व राज्य सरकारने ओबीसीची जनगणना करावी, ओबीसींचे ७२ वस्तीगृह त्वरित सुरू करावेत, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित द्यावी, शेतकºयांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यासाठी ही मंडल यात्रा पूर्व विदर्भात निघाली असून नागपूर वरून ३० जुलैला लाखनी येथे संध्याकाळी वाजता ही यात्रा पोहोचणार आहे. मंडल यात्रेचे स्वागत व सभा स्वागत सेलिब्रेशन लान येथे होणार असून सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाळकृष्ण सार्वे, मार्गदर्शक उमेश कोरराम, जयंत झोडे, प्रा. अनिल डहाके, दीनानाथ वाघमारे मार्गदर्शन करणार आहेत.

विशेष अतिथी म्हणून महिला व बालकल्याण सभापती स्वातीताई वाघाये, जिल्हा परिषद सदस्या डॉ.मनीषाताई निंबार्ते लाखनी, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी सार्वे, उपसभापती गिरीश बावनकुळे, नगरसेवक प्रदीप तितीरमारे, सरपंच शेषराव वंजारी तसेच विशेष उपस्थिती मनोज ईश्वरकर, कमलेश झंजाळ, विलास गोमासे, गोपाल सेलोकर, सदानंद इलमे, के. झेड. शेंडे, संजय मते मुकेश पुडके सभेला उपस्थित राहणार आहेत. ७ आगस्ट हा ओबीसींचा अधिकार दिन असून याच दिवशी ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी बांधवांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार मिळाले आणि म्हणून या दिवसाची आठवण राहावी म्हणून ही मंडल यात्रा संपूर्ण विदर्भात फिरत आहे. या मंडल यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक ओबीसी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे, गोपाल नाकाडे, माधवराव भोयर, आनंदराव उरकुडे, विकास गायधनी, ईश्वरदास राणे, विलास लांजेवार, यादव गायकवाड, संजय वनवे, पुरुषोत्तम झोडे, देवराम फटे, किशोर कठाणे, धनराज ठवकर, अमित गायधनी, दिलीप नागलवाडे, विनोद बांते यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *