भंडारा-वरठी, नेरी-कांद्रीपर्यंत सकाळची बसफेरी सुरू करा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा डेपोची भंडारा – वरठी, नेरी ते पिंपळगाव, खमारी, हरदोली, सीतेपार, पांढराबोडी, काटी, धूसाळा ते कांद्री – पर्यंत भंडारा बसस्थानकावरून सकाळी ८ वाजताची बसफेरी जुन्याच वेळापत्रकानुसार सुरू करा. परिसरातील नागरिक, प्रवाशी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशी, नागरिक विद्यार्थ्यांनी केली आहे.’प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे एस. टी. विभागाचे ब्रीद वाक्य असून गाव तेथे बस सेवा असे धेय्य धोरण आहे. आधी भंडारा, नेरी ते कांद्री पर्यंत भंडारा बसस्थानकावरून सकाळी ८ वाजता, दुपारी १ वाजता आणि रात्री वाजताची बससेवा ७ नियमितपणे सुरू होती. त्यामुळे नागरिक प्रवाशी व विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोयीस्कर होते. यापैकी दुपारची करणे सोयीस्कर होते. यापैकी दुपारी आणि रात्रीची बस सेवा सुरू आहे; परंतु भंडारा बसस्थानकावरून कांद्रीकडे जाणारी सकाळी ८ वाजताची बस से वा सुरू नसल्याने प्रवाशी नागरिकांना भंडारा येथे कामानीशी जाण्यास तसेच विद्यार्थ्यांना वरठी व भंडारा येथील महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची बस सेवा उपलब्ध नसल्याने सीतेपार, कांद्री, धुसाळा, काटी, पांढराबोडी, हरदोली, पिंपळगाव, नेरी या गावातील नागरिक प्रवाशी व विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रवाशी नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी ओरड आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *