बहुजन समाज पार्टीतर्फे छत्रपति शाहू महाराज जयंती आणि बुथ कार्यकारिणी तयार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गाव चलो अभियान अंतर्गत बहुजन समाज पार्टीतर्फे दिनांक २९ जून २०२३ गुरुवार ला भंडारा विधानसभा ता. पवनी तील पिंपळगाव जिल्हा परिषद मधील गाव तिर्री येथे छत्रपति शाहू महाराज जयंती आणि सेक्टर तसेच बुथ कार्यकारिणी तयार करन्यात आले. या कार्यक्रमाला बसपा भंडारा महासचिव डॉ.ए.पी.के संघरत्ने, बसपाभंडारा विधानसभा महासचिव लोमेश चव्हाण, तसेच बसपा भंडारा विधानसभा कोषाध्यक्ष अमित तिरपुडे, बसपा भंडारा विधानसभा बी.व्ही.एफ संयोजक सुनिल शिवरकर, बसपा भंडारा विधानसभा संघटन सचिव अमित रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. बसपा भंडारा महासचिव डॉ.ए.पी.के संघरत्ने यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि ओबीसी जनगणना आदी समस्यांबाबत जनतेला जागरूक करून देण्याचा निर्देश कार्यकतार्नी दिला.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पप्पू मोटघरे, प्रभू गजभिये, पंढरी तिरपुडे, गौतम देशपांडे, जितू हुमने, राकेश साफेकर, दिपक बनसोड, विनोद मेश्राम, मोबिन साफेकर, निकेतन खोब्रागडे, मिथून हुमने बहुजन समाज चे बांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *