बुद्ध जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : नजीकच्या आंबाडी येथे बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका केन्द्र येथे भरारी सोशल फाउंडेशन व दीघार्यू क्लिनिकल दवाखाना तसेच साई पॅथोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील गरीब व गरजू वृध्द मुल व युवा वर्गातील ग्रामस्थाना दृष्टी हिंनता सारख्या आरोग्याच्या सुविधापासून दुर्लक्षित असल्यामुळे पुढे गंभीर आजाराचा शिकार होऊन मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून बुध्द पौर्णिमेचे महत्त्व लक्षात घेऊन मोफत आरोग्तपासणी शिबीर व औषधी वितरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. यावेळी जनरल फिजिशियन व बालरोग तज्ञ डॉ. अक्षय साठवणे यांच्या मार्गदर्शनात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून गरजूंना मोफत औषध वितरण करण्यात आले तर साई पॅथोलॉजीकडून रक्त तपासणी करून रुग्णांना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी नेत्र रोग तज्ञ चिकित्सक डॉ. वाहाणे, आरोग्य सेविका शारदा डाहारे, साई पॅथोलॉजीचे मधुमेह तज्ञ रोशन नंदनवार, आकाश देवतरे, स्वरूप महांकाळकर, औषध वितरक रुपेश साठवणे, शुभांगी खरवडे व तपासणी चमु ने योगदान दिला. या आरोग्य तपासणी चे उद्घाटन सरपंच भजन भोंदे, अमीर बोरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रा. संजय भुरे, पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी, बौध्द विहार कमेटीचे स्वप्नील तिरपुडे, शुभम बोरकर, शशांक बोरकर, निशांत राऊत, राहुल बोरकर, रोहीत राऊत, गोलु वासनिक, विलास गडकरी, चेतन काणेकर, विशाल बोरकर, प्रज्वल बोरकर आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *