नईम शेख हत्याकांड प्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी नईम शेखचा पाठलाग करून बहुचर्चित खून प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व १६ आरोपी विरोधात जिल्हा न्यायालयात आरोप पत्र दाखल केले.हे आरोपत्र एक हजार एकशे त्र्यात्तर ११७३ पानांचे आहे.तुमसर शहरातील नईम शेख २५ सप्टेंबर २०२३ ला सायंकाळी साथीदारांसह कारने तिरोडी येथून तुमसरकडे परत येत होता. गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ नईम शेख याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून करण्यात आला.या प्रकरणी १६ आरोपींवर पोलीस स्टेशन गोबरवाही येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तपासातील महत्त्वाचे मुद्दे, त्यातील गांभीर्य आणि सर्व गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासून यातील संतोष डहाट, सतीश डहाट,शुभम पंधरे,रवी बोरकर,गुणवंत यवकार, आशिष नेवारे,अमन मेश्राम, विशाल मानेकर या ८ आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ चे अन्वये आरोपींवर खटला चालवण्यास मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी मंजूरी दिली आहे.

तर आरोपी दिलखुश कोल्हाटकर,सचिन भोयर,आशुतोष घडले,विनेक सांडेकर, नरेंद्र पिप्पलधरे, सुरेंद्र पिप्पलधरे या सहा आरोपीची मोक्यातून मुक्तता झाली असून यांच्यावर राज्य शासनाने मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यास मनाई केली आहे. नईम खून प्रकरणात सहभागी असलेले १२ आरोपी भंडारा, नागपूर, चंद्रपूर या कारागृहात बांधिस्त असून त्यातील दोन आरोपी विनेक सांडेकर,विशाल मानेकर अद्याप फरार आहेत.तर या खून प्रकरणी मुख्य आरोपीला आश्रय देण्यासंबधी विश्वनाथ बांडेबुचे, विजय पुडके यांच्यावर कलम २१२,२१६ अंतर्गत कारवाई करून यांच्याविरोधात सुद्धा आरोप पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव आय. पी. एस करीत आहेत. सदर खुन प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्हा वासीयांचे लक्ष लागुन आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *