श्रीराम हिंदू युवा मंच करणार आज श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य सोहळा साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरातील प्रत्येक धार्मिक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेली श्रीराम हिंदू युवा मंच यंदाही गुरुवार दि. ३० मार्च ला श्रीराम नवमी जन्मोत्सवाचा भव्यसोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात दूपारी ३ वाजता प्रभु श्रीराम मुर्तींची प्राणप्रतिष्ठा पुजन, भव्य महाप्रसाद सायंकाळी ५ पासून आणि विशेष म्हणजे श्रीराम नवमी शोभायात्रेतील सर्व भक्तभाविकांसाठी शरबत वितरण करण्यात येणार आहे. सदर सर्व आयोजन लाखांदूर चौक साकोली येथे असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा क्षेत्रातील आमदार नाना पटोले हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रीराम जन्मोत्सव सोहळा निमित्त विशेष हिंदू संस्कृतीमय वाद्यांवर आयोजन असून जास्तीत जास्त भक्तभाविकांनी या जल्लोषमय सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन श्रीराम हिंदू युवा मंच साकोली यांनी केलेले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *