मोहाडी तालुक्यात शेतामध्ये आढळले वाघाचे पगमार्क

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव जांब-कान्द्री शेतशिवारात योगेश निमकर यांच्या शेतावर शुक्रवार दि.३ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजता पट्टेदार वाघ दिसल्याची घटना घडली. वाघ असल्याची माहिती वनविगाला देण्यात आली.लगेच जांब (कांद्री) येथील वनपरीक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे वक्षेत्रसह्य्यक मेश्राम आपल्या कर्मचारीसह दाखल झाले. व वाघाचा शोध मोहीम सुरू केला.

शेतामध्ये वाघाचे पगमार्क दिसून आले तेव्हा परिसरातील शेतकºयांनी सतर्क राहण्याची सूचना केल्या. शोधमोहीम सुरू असतानी तो वाघ दिसला नाही तो त्त्या परीसरातुन निघुन गेला असावा अशा अंदाज आहे. या मुळे परीसरातील नागरिक भयभीत झाले आहे. हंगामातील शेतीची कामे कशी करावी अशा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. मोहाडी तालुक्यातील शेतकरी सकाळी शेतावर गेल्यानंतर कधी वाघ दिसेल यांचा नेम राहिला नाही, कारण एका दिवसा पाठोपाठ शेतकºयांना वाघाचे दर्शन घडून येतआहे.हे वाघ आले कुठून ? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. मोहाडी तालुक्यात अनेक दिवसा ंपासून वाघाचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास येत आहे, परिसरातील गावामधील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकरी शेतमजूर भयभीत झाले आहे.

कारण रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतीचे कामे कसे करावे या विवंचनेत येथील शेतकरी पडला आहे. जांब (कांद्री) येथील वनक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वनकर्मचारी वाघ शोधुन काढण्यासाठी परीसरात गस्ती सुरू आहे.

वाघाने फोडली डरकाळी अन नागरिकांनी ठोकली धूम

मोहाडी तालुक्यातील आंधळगाव सालई खुर्द नागठाना शेतशिवारात परमेश्वर लिल्हारे,नितीन लिल्हारे, राजेश दमाहे,रामकरण दमाहे, प्रतिक हिरकने,हरीश मांढरे,झनकलाल दमाहे, रतन ठाकरे,शैलेश लिल्हारे, मुकेश पटले,वैष्णव पटले,गणेश नेवारे आदी लोकांना शनिवार दि. ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान पट्टेदार वाघ दिसल्याची घटना घडली.वाघ दिसताच नागरिकांनी व्हिडिओ काढुन सोशल मीडियावर व्हायरल करताच नागरिकांनी गर्दी केली.नागरिक घटनास्थळी दाखल होताच वाघाने डरकाळी देताच नागरिकांनी गावाकडे धूम ठोकली.त्यामुळे परीसरातील नागरिक भयभीत झाले आहे, तरी कान्द्री वन विभागाने त्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मात्र घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांना देताच क्षेत्र सहायक निखिल साखरवाडे, वनरक्षक उचिबघेले,वनमजूर मदन हिरापुरे घटनास्थळी दाखल झाले.मागील आठ दिवसापासून या परिसरात शेतकºयांना वाघाचे दर्शन होत आहे.त्यामुळे आठ दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला असल्याने रब्बी हंगामातील शेतीची कामे कशी करावी अशा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.मोहाडी तालुक्यातील शेतकरी सकाळी शेतावर गेल्यानंतर कधी वाघ दिसेल यांचा नेम राहिला नाही,कारण एका दिवसा पाठोपाठ शेतकºयांना वाघाचे दर्शन घडून येत आहे. शेतकरी शेतावर एकटे जाण्यासाठी घाबरत असल्याने परिसरातील गावामधील लोकांनमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नेहमी प्रमाणे शेतकरी शेतात काम करत असतांना वाघ झाडाखाली बसून होता.वाघ दिसून आल्याची माहिती गावकाºयांना देताच वाºयासारखी पसरली. मात्र डरकाळी देत वाघ जंगलाच्या दिशेने निघाला.मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *