अहोरात्र कर्तव्य बजावणाºया लाईनमनचा महावितरणकडून सन्मान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाºया लाईनमनच्या सन्मानार्थ महावितरणच्या वतीने नागपूर परिमंडलच्या विविध विभाग, उपविभागात लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्यात आला. त्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली तसेच सुरक्षा साधनांच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विशेष कार्यक्रमात कर्तव्याचा आवर्जून सन्मान केल्याबद्दल जनमित्रांनी आभाराची भावना व्यक्त केली. काँग्रेसनगर विभागात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अनुजा पात्रीकर उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद धाडे यांनी जनमित्रांना सुरक्षितता विषयक मार्गदर्शन दिपाली माडेलवार यांच्या उपस्थितीत लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

एमआयडीसी उपविभाग, हिंगणा उपविभाग, मौदा उपविभाग, कन्हान उपविभाग, कळमना उपविभाग, बुटीबोरी विभाग, उमरेड विभाग येथे लाइनमन दिवस साजरा करण्यात आला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कळमेश्वर शहर कार्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता पंकज होनाडे तसेच सहाय्यक अभियंता मनोज पुरी, राहुल लांजेवार, रजत पवार व लाईनमन बंडू पिंपळे, सौ मंजुषा कडू, राजेश राऊत, श्रीराम तांदळे व उपविभागातील सर्व तांत्रिक कर्मचारी हजर होते. कार्यक्रमात ठाकरे यांनी सुरक्षा साधनाचा वापर याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियमित व बाह्यस्त्रोत महिला आणि पुरुष जनमित्रांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पुरी यांनी व आभर प्रदर्शन लांजेवार यांनी केले. वर्धा विभाग येथे आयोजित कार्यक्रमात अधीक्षक अभियंता अशोक कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार यांच्यासह पारशिवनी नगर परिषदेच्या अध्यक्षा कुंभलकर, पंचायत समिती सभापती निंबोने यांनी मोलाचे मार्गर्शन केले. कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता मानमोडे, सहाय्यक अभियंता डोंगरे, गायकवाड, जालंधर, खोपे, मनघटे, धानोले, सोमकुवर जनमित्र आणि उपविभागीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डोंगरे यांनी केले. गांधीबाग विभागीय कार्यालयाच्या वतीने लाईनमन दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश होगे यांनी सुरक्षतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यकारी अभियंता जीवतोडे, प्रमुख पाहुणे करकुंडवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता तुपकर, फाटे यांनी उपस्थितांना मार्गर्शन केले. तसेच अरविंद चौरे, मेश्राम आणि नितीन शेंदरे या जनमित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन योगेश वतारी यांनी केले व आभार प्रदर्शन रणदिवे यांनी केले. काटोल विभाग अंतर्गत लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.यावेळी अधीक्षक अभियंता (पायाभूत केले.

पारशिवणी उपविभागीय कार्यालय येथे लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा गीप्रसंकार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्युत निरीक्षक करकुंडवार, उपकार्यकारी अभियंता ईश्वरकर आराखडा) अजय खोब्रागडे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) राजेंद्र गिरी आवर्जून उपस्थित होते. खापरखेडा उपविभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता सावंत, विद्युत निरीक्षक वर्धा, सर्व जनमित्र व अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमात उपस्थितांना सुरक्षेची शपथ देण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *