पावसाने केले उन्हाळी धानपिक व भाजीपाल्याचे अतोनात नुकसान

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : मागील चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. शेतकºयांनी उन्हाळी धान व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. पीक परिपक्व झाले असून काही तोडणीसाठी आलेले आहेत तर काही १० ते १५ दिवसांपासून कापणीला येवून शेतकºयांच्या हातात पीक येणार आहे. काहींनी धान कापणी केली असून अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. कधी उनं तर कधी ढगाळी वातावरण निर्माण होत असल्याने शेतकºयांची धाकधूक वाढत आहे. तुमसर तालुक्यासह सिहोरा-बपेरा परिसरात गत चार-पाच दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली.

शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजल्यापासून सुरू झालेला जोरदार पाऊस रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत सुरूच होता. सोमवारीही रात्री मेघगर्जनेसह पाऊस पडला. पावसाळ्यात लागणाºया झडीप्रमाणे अवकाळी पाऊस परिसरात बरसत असल्याने उन्हाळा सुरूआहे की पावसाळा? असा प्रश्न उपस्थित होत असून उन्हाळ्यातही रेनकोट व छत्री ठेवण्याची वेळ आली आहे. असावातावरण निर्माण झाल्याने व्यावसायिकांना कुलर विकावे की छत्र्या विकाव्या असा प्रश्न तर पडला आहे. त्याचबरोबर लग्नकार्यावरही संकट कोसळले आहे. आनंदाच्या क्षणात या नैसर्गिक संकटाने मात्र लग्नकार्यातील आनंद, उत्साहात हिरावून घेतला आहे. २८ एप्रिल पासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी दिवसभर आकाश निरभ्र होता.

मात्र रात्री पुन्हा अवकाळी पाऊस बरसला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांना जरी या पावसाने काहीसा दिलास दिला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. धान व भाजीपाला अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरासह तालुक्यात पावसाने अक्षरश: घुमाकूळ घातला आहे. शेतकºयांनी पै-पै गोळा करून पिकांना जपले. मात्र अवकाळी पावसाने हाता-तोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती हिरालाल नागपुरे यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *