अज्ञातांनी चार एकरातील धानाचा पुंजना जाळला

लाखांदूर : तालुक्यातील बोथली येथील संजय रामचंद्र ढोरे यांच्या शेतातील चार एकरातील धानाचा पूंजना अज्ञातांनी जाळल्याची घटना ३० आॅक्टोबरच्या रात्री दरम्यान घडली. अज्ञाताचा या कृतीमुळे पीडित शेतकºयाचे जवळपास दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बोथली येथील संजय रामचंद्र ढोरे यांनी आपल्या चार एकर शेतात यंदा खरिपात धान पिकाची रोवणी केली होती. नुकतेच धानाचे पीक पूर्ण भरल्यानंतर काही दिवसापूर्वी धान पिकाची कापणी केली व शेतातच पुंजणा तयार करून ठेवला. दिवाळीपूर्वी धानाची मळणी करून सण आनंदात साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या संजय ढोरे यांच्या धानाचा पुंजना जळाल्याने ते मोठ्या संकट कोसळले असून आनंदावर विरजण पडले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *