दुबईत झालेल्या स्पर्धेत ८१ वर्षीय यादव यांनी जिंकले ४ गोल्ड मेडल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- खेळायचं काही वय नसते माणूस कोणत्याही वयात आपल्याला हवी असलेली गोष्ट पूर्णत्वास नेऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गोंदियातील धावपटू मुंनालाल यादव आज ८१ वर्षा चे असून तरी त्यांनी या वयात सर्वांना लाजवेल अशी कामगिरी दुबई येथे करून दाखवलेली आहे. दुबईमध्ये यांनी ४ गोल्ड मेडल जिंकले आहे. त्यांनी ५ किलो मीटर १००, मीटर २००, मीटर व लाब उडी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आणि त्यांनी या ४ हि स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहे. आज त्यांच्या गोंदिया आगमना झाले असता त्यांचे गोंदिया कारणांनी रेल्वे स्टेशन वरच डोल वाजवत भव्य असे स्वागत करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आपल्याला पूर्वी जाणीव झाली असती तर आपण आॅलम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळाला असता असा आत्मविश्वास मुनालाल यादव यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

मुन्ना लाल यादव हे गोंदिया शहरातील रहवासी असून दोघेही पती-पत्नी आहेत, गायीच्या दुधापासून आपला भरण पोषणाचा काम करत आपला उदर् निर्वाह करीत असतात. दोघे ही एकमेकांचा आधार आहे. अशातच मुन्ना लाल यादव यांना धावण्याची हौस खूप आहे. या वयातही त्यांनी भारतात अनेक ठिकाणी वयोवृद्धांच्या धावनांच्या शर्यतीत भाग घेऊन अनेक बक्षिसं मिळवली आहेत. अशातच काही दिवसापूर्वी त्यांनी देहरादून या ठिकाणी वयोवृद्धांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये या यश संपादन करून तीन गोल्ड मेडल मिळवले आणि आता दुबई येथे झालेल्या हॅमर स्पोर्ट एक्जीबिशन आॅर्गनायझेशन या धावण्याच्या स्पर्धेमध्ये मुन्नालाल यादव यांची निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या दुबई येथे २७, २८ आणि २९ आॅक्टोबरला स्पर्धेत भाग घेतला व गोल्ड मेडल जिंकून आणले आहे. तर या स्पर्धेत भाग घेऊन भारत, महाराष्ट्र आणि गोंदिया शहराचे नाव उज्वल केला आहे…

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.