लाभार्थ्यांच्या ‘आनंदाला बुरशी’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यात अनेक ठिकाणी रेशन दुकानातुन वाटप करण्यात आलेल्या ‘आनंदाचा शिधा’ पॅकेटात निकृष्ट दजार्चे साहित्य असल्याचे दिसुन येत आहे . तालुक्यातील डोंगरगाव येथे रास्त दुकानातुन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या ‘आनंदाचा शिधा’ किटमधील एका पॅकेटात मेलेल उंदीर आढळुन आले तर चणा डाळीला बुरशी लागली असल्याचे दिसुन आल्याने लाभार्थ्यांच्या ‘आनंदाला बुरशी’ लागल्याची संतप्त प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे असाच प्रकार ग्राम नेरी येथे सुध्दा काही दिवसा अगोदर उघडकीस आला होता.

गुढीपाडवा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधुन राज्य सरकारच्या पुरवठाविभागातर्फे रास्त भाव दुकानांमधुन ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येत आहे. अंत्योदय व प्राधान्य कार्डधारकांना १०० रूपयांत चणाडाळ, पामतेल, रवा व साखर या चार वस्तु एकत्रित असलेली किट महाराष्ट्र शासनाने देण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. मोहाडी तालुक्यातील ग्राम डोंगरगाव येथे रास्तभाव दुकानातुन ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप दर्जाच्या साहित्याचे वाटप करण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये तिव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. लाभार्थ्यांनी घरी गेल्यानंतर ‘आनंदाचा शिधा’ किटचे बंद पॅकेट उघडुन बघीतले असता पॅकेटमधील डाळीला बुरशी लागल्याचे दिसुन आले. हा प्रकार उघडकीस येताच करण्यात आले. त्यात अत्यंत निकृष्ट एकच खळबळ माजली आहे.

आनंदाचा शिधा पॅकेटातुन बुरशीजन्य डाळीचे वाटप

माज्या घरी डोंगरगाव ता.मोहाडी येथील रेशन दुकानातून मिळालेला आनंदाचा शिधा हा बुरशीजन्य व अतिशय दुगंर्धीयुक्त आहे. किटमधील पहिल्या पाकिटातून मेलेले उंदीर मिळाले, म्हंटल बाकीचे पॅकेट असल्याने जाऊ दे काही नाही होत. पण आतल्या डाळीच्या पॅकेट मध्ये बुरशीलागलेली आणि दुगंर्धायुक्त डाळ आढळली. यामुळे मी या आनंदाच्या शिधा साठी दिलेले पैसे वाया गेले. मी एक ग्राहक म्हणून माझी फसवणूक महाराष्ट्र शासनाने केली हे त्यांनी छापून दिलेल्या पाकिटावरून समजते. शासनाने मला न्याय द्यावा. गावात असेच पाकीट सर्वांना मिळाल्याची माहिती आहे. विजय कुंडलिक भुरे, लाभार्थी रा.डोंगरगाव, ता. मोहाडी जिल्हा भंडारा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *