राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने लोक हैराण झाले आहेत. रविवारी नवी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर उष्माघातामुळे ११ जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, उष्णतेच्या लाटेपासून किरकोळ दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच १७ एप्रिल रोजी मुंबईत किमान तापमान २३ आणि कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, आज (सोमवार) मुंबईत आकाश निरभ्र असल्याने सूर्य तापणार आहे. तर १८ एप्रिलला मुंबईत किमान तापमान २३ आणि कमाल तापमान ३५ अंशांवर नोंदवले जाऊ शकते. त्याचवेळी मुंबईत दुपारपर्यंत अंशत ५ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १९, २०आणि २१ एप्रिल रोजी किमान तापमान २४ अंशांवर नोंदवले जाऊ शकते.तर, कमाल तापमान ३४ ते ३५ अंश राहू शकते.

औरंगाबाद हवामान

आज औरंगाबादमध्ये किमान तापमान २० तर कमाल तापमान ३९ अंशांवर जाऊ शकते. उद्या म्हणजेच १८ एप्रिल रोजी किमान तापमान २० आणि कमाल तापमान ४० अंश असू शकते. दुसरीकडे उद्या औरंगाबादमध्ये आकाश निरभ्र असेल. १९ एप्रिल रोजी कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. मात्र, मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. २० आणि २१ एप्रिलला कमाल तापमान ३८ ते ३९अंशांपर्यंत राहील.

नागपूरचे हवामान

नागपूरचे कमाल तापमान ४२ अंश असून १८ एप्रिल रोजी नागपुरात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी १९ एप्रिल रोजी पुन्हा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर १८ आणि १९ एप्रिलला नागपुरात कमाल तापमान ४२ अंशांवर जाऊ शकते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *