संस्कारांच्या विद्यार्थ्यांनी गिरवले हसत खेळत विज्ञानाचे धडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरापासून ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादा धुनीवाले देवस्थानात गांधी विचार मंच, मुंबई सर्वोदय मंडळ मुंबई, किर्तन केंद्र मुंबई, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्युकेशन भंडारा व रामपा बहु. सेवाभावी संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच दिवसापासून ग्रिष्मकालीन संस्कार शिबीर सुरू आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभाग राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे, संस्कार शिबीर प्रमुख विलास केजरकर, सहशिबिर प्रमुख यशवंत बिरे, दादाजी धुनिवाले (मठ) देवस्थानचे कार्याध्यक्ष प्रतिकुमार टांगले, वैभव चेटूले, नितेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यात मान्यवरांकडून विविध विषयांवर शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यात येत असते.

त्यात शिबिरार्थ्यांनी हसत खेळत विज्ञानाचे धडे गिरवले आहे. या शिबिरात हसत खेळत विज्ञानाचे प्रयोग लहान मुलांना शिकविण्यात आले. त्यावेळी स्वत: प्रयोग केले आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभाग राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी हसत खेळत विज्ञान व विज्ञानाचे प्रयोग सांगितले आहे. या कार्यक्रमात दिगांबर टांगले, आर्या सुखदेवे, माही बांडेबुचे, राशी बान्ते, आराध्या गोस्वामी, माही सलामे, जय खवास, मंथन गाढवे, मानवी सलामे, सुचित बांडेबुचे, पूर्वी खवास, वंशिका निंबार्ते, त्रिशा धोटे, वेदांत मते, वेदिका निंबार्ते, आरोही गोस्वामी, मंथन गाढवे, यशस्वी वाढई इत्यादी शिबिरार्थी लहान मुलांनी आनंद घेतला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.