सुनील फुंडे यांचे फेसबुक हॅक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुम्ही फेसबुक वापरत असाल तर सावधान. तुम्हाला फेसबुकवरुन राष्ट्रवादीचे नेते तथा भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या अकाऊंटवरुन मेसेज येईल आणि मदत करा, असे सांगितले जात असेल तर खबरदारी घ्या. बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचे अकाऊंट हॅक करून फसवणूक केली जात आहे. भंडारा जिल्ह्यात आॅनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील फेसबुकधारकांना धक्का देणा?्या घटना घडत आहेत. सध्या क्रिप्टो करन्सी व ओटीपी मागून आॅनलाईन फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघड झालेले आहेत.अशातच फेसबुकवरुन मेसेज पाठवून फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वेगवेगळ्या नावाने आलेल्या फोनवरील व्यक्ती तुम्हाला रक्कम देण्यासाठी स्कॅनर पाठवते आणि त्यावरून तुम्ही विश्वास ठेऊन मदत केल्यास तुमच्या अकाऊंटवरचे पैसे जातात किंवा फोन पे, गुगल पे, यूपीआयद्वारे पाठवलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकत नाहीत. याबाबत सायबर विभागाकडे आॅनलाईन तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. विशेष म्हणजे फसवणूक करणारी ही हॅकर्समंडळी सातत्याने तुम्हाला फोन करीत राहतात. वेगवेगळ्या नंबरने त्यांचे फोन येत राहतात. फेसबुकवर अस्सल मराठीत मेसेज टाईप केला जातो आणि अधिकाºयांची नावेसांगून हॅकर्स हिंदीतून बोलतात. त्यामुळे फेसबुकवरुन येणाºया मेसेजबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *