सेवा पंधरवडा कार्यक्रमात महावितरणतर्फे नविन घरगुती विज जोडण्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महावितरण प्रशिक्षण केंद्रात आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संदीप कदम याच्या हस्ते १४ नविन घरगुती विज जोडण्या व १२ नावात बदलाचे अर्ज निकाली काढण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून अधिक्षक अभियंता राजेश नाईक हे होते. तसेच विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता निरज वैरागडे, मंडळाचे कार्यकारी अभियंता शैलेशकुमार, महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्युत ग्राहक उपस्थित होते. सेवा पंधरवडा कार्यक्रमामध्ये ग्राहकांच्या प्रलंबीत असलेल्या घरगुती नविन विद्युत जोडणीस तात्काळ मंजूरी देण्यात आली. मंजूरी देण्यात आलेल्यांना मालमत्ता हस्तांतरण देण्यात आले व विद्युत जोडणीमध्ये नविन मालमत्ता धारकांची नावे तात्काळ नोंदविण्यात आली. लाभ देण्यात आलेल्या ग्राहकांचा जिल्हाधिकारी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *