शालेय वेळेत बसफेºया सोडा,अन्यथा आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी देवरी/ मुल्ला : देवरी-आमगाव मार्गावर शालेय वेळेनुसार बसफेºया संचालित होत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानासह अनेक गैेरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शालेय वेळेत बसफेºया सोडा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिप सदस्य राजेश चांदेवार यांच्या नेतृत्वात पालक व विद्यार्थ्यांनी दिला आहे. तसे निवेदन २७ सप्टेंबर रोजी गोंदिया आगार प्रमुखांना दिले आहे. देवरी-आमगाव मार्गावरील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी तालुकास्थळ देवरी येथे येतात. एसटी बस हे विद्यार्थ्यांचे प्रवासाचे प्रमुख साधन आहे. सवलतीवर प्रवासासह मुलींसाठी मानव विकास योजनेतंर्गत मोफत प्रवासाची योजना राज्य परिवहन महामंडळ राबवित आहे. मात्र संबंधित आगाराचे बसफेºयांचे वेळापत्रक पाळले जात नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. देवरी-आमगाव मार्गावर देखील याचा अनुभव येतो. विद्यार्थ्यांना शालेय वेळेवर सकाळी १०.३० वाजेपर्यंत देवरीला पोहचणे आवश्यक आहे व सांयकाळी शाळा सटल्यानंतर घरी जाण्यासाठी ५.१५ वाजेपर्यंत बस उपलब्ध असने आवश्यक आहे. परंतु या वेळेवर या मार्गावर बस उपलब्ध नाही. शालेय वेळेनुसार बसफेºया संचालित होत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानासह अनेक गैेरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शालेय वेळापत्रकानुसार व विद्यार्थ्यांच्या हिताकरिता या मार्गावर शालेय वेळेत बसफेºया चालविण्यात याव्यात, अन्यथा आंदोन करण्याचा इशारा माजी जिप सदस्य राजेश चांदेवार, सामाजिक कार्यकर्ते दीपक माटे, युगेश्वरसिह पवार, विद्यार्थी तृषार ब्राम्हणकर, लोकेश चामलाटे, उर्जव कोसरे, आदेश कोडवते, दिशा बिसेन, मनिषा चनाप, जानवी फुंडे, श्रेया राऊत आदी पालक व विद्यार्थ्यांनी दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *