२.१२ लाखांची देशी-विदेशी दारु जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दुचाकीने अवैधरित्या देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाºया दोन आरोपींना अटक करुन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ३० मार्च रोजी शहरातील शिवाजी चौकात २ लाख १२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलिस विभागातर्फे कायदा व सुव्यवस्था बाधित करणाºया तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयाविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

यांतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ३० मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून शिवाजी चौकात अर विंद यशवंत डोंगरे (२५, रा. तांडा) व किशोर प्रभुदास शहारे (४१, रा. म्हसगाव) यांना दुचाकीने अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडले. दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून दारु व दुचाकी असा एकूण २ लाख १२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलिस ठाण्यात कलम ६५5 (ई), ७७ (अ) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस अंमलदार कृपाण, पोलिस हवालदार हलमारे, लुटे, बिसेन, पोलिस शिपाई रहांगडाले यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *