तक्रारकर्ताच निघाला चोर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : घरी चोरी झाल्याची तक्रार देणारा तकह्यारकर्ताच चोर निघाला असल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले. विशेष म्हणजे अवघ्या चार तासांत पोलिसांनी चोरीचा उलगडा केला. गोरगाव शहरातील त्रिमूर्ती चौक येथील घरी रविवार ८ जानेवारी रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची तकह्यार रविंद्र कपुरचंद रहांगडाले यांनी गोरेगाव पोलिसात दिली. यावेळी तकह्यारकत्यार्ने घरचे सगळे सदस्य शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे महाप्रसाद घेण्याकरीता गेले असता कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरी करून रोख व सोन्याचांदीचे दागिणे असा १ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तकह्यरीत नमूद केले. पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिस पथकाने घटनास्थळाला भेट देत आजू-बाजूचे परिसर व सी.सी. टी.व्ही. फुटेजची तपासणी केली असता तकह्यारदार रविंद्र रहांगडाले या घटनेच्या वेळी घरी येवून साधारण २० मिनिटे थांबल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. यावरून रविंद्र रहांगडाले याची कसुन विचारपूस केली. दरम्यान त्याने कर्जबाजारी पणामुळे स्वत:च्या घरी चोरी केल्याची कबूली दिली. रविंद्रला ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *