राज्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा; शेतक-यांची उडवली झोप!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असून शेतक-यांची झोप उडवली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भातील काही गावांत गारांचा वर्षाव झाला. दरम्यान, १० एप्रिलपर्यंत पावसाळी वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी रात्रीपासून राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारीही काही भागांत पावसाचा जोर होता. भंडारा जिह्यातील पवनी, लाखांदूर, साकोली, तुमसर तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळला. लाखांदूर तालुक्यातीलकाही भागांत सोसाटयाच्या वाºयासह गारांचा वर्षाव झाला. यामुळे रब्बी हंगामातील आंबा, लिंबू, संत्रा आदी फळबाग तथा गहू, ज्वारी तसेच भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाºयामुळे कांदा शेड, घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत. दरम्यान, पवनी तालुक्यात येथे सोसाटयाच्या वाºयामुळे काही घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. तर लाखांदूर तालुक्यात बोअरवेल व सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांचे धान पिक लोंबीवर आले असता शुक्रवार व शनिवारी आलेल्या गारपिटीने धान पिकांचे आतोनात नुकसान केले आहे. बेमोसमी पावसामुळे या वर्षी देशातील गहू उत्पादनात १० ते २० लाख टनांची घट होण्याची शक्यता फूड कॉपोर्रेशन आॅफ इंडियाच्या सूत्रांनी व्यक्त केली. मात्र केंद्रीय अन्न मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुबोधसिंह यांनी अवकाळी पावसाने १० ते २० लाख टन गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली आहे.

‘‘राज्यात वादळी वाºयासह पाऊस झाला आणि विजाही कोसळल्या. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यात बोरजा येथेही एक वीजबळी गेला. परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यात मांडेवडगाव येथे वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्यात वीज पडून तीन, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. कोल्हापुरातही वीज पडून एकाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सटाणा, मालेगाव तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा फटका बसत आहे. यामुळे कांदा, डाळिंब, द्राक्षबागांसह शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावतीपर्यंत पावसाने हजेरी लावली. मराठवाडयाला खेटून असलेल्या बुलढाणा, जळगाव, नगर जिह्यांनाही अवकाळीने जबर तडाखा दिला. एप्रिलमध्ये पावसाळी वातावरण बघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अनेक शेतकºयांनी सांगितले. या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचीही नासाडी केली. पपई, खरबूज, टरबूज, आंबा, संत्री, कांदा पिकांचा अक्षरश: चिखल झाला.’’

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *