रात्रगस्त दरम्यान पोलिसांना मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाºया आरोपींनी आमगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाºयांना मारहाण केली. ही घटना रविवार, ११ जून रोजी रात्री तालुक्यातील भोसा येथे घडली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आमगाव तालुका मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागून असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे होत असतात. या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिस प्रशासन नियमीत गस्त करीत असून अवैध व्यावसायावर कारवाई करीत आहे.

यातंर्गत आमगाव पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी भोसा येथे रात्रीची गस्त घातल असताना त्यांच्यावर अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाºया आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना मारहाण, शिविगाळ करीत त्यांचा मोबाईलही हिसकावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच आमगावचा पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. दरम्यान, जखमी पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भुमेश्वर बुधराम ब्राह्मणकर, सुनील भुमेश्वर ब्राह्मणकर, अनिल भुमेश्वर ब्राह्मणकर, मनोहर फरकुंडे, संतोष ब्राह्मणकर या पाच आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *