दोन एकरातील धान पुंजणे जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोरेगाव : तालुक्यातील पाथरी येथील भुताईटोला शिवारातील शेतात कापून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमांनी आग लावली. यात धिवेरू चंदू रहांगडाले या शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास घडली. धिवेरु रहांगडाले यांनी आपल्या शेतातील धानाची कापणी करुन शेतातच त्याचे पुंजने ठेवले होते. दरम्यान सात वाजताच्या सुमारास अज्ञात इसमांनी धान पुंजण्याला आग लावली. आगीची माहिती मिळताच रहांगडाले यांच्यासह गावकºयांनी शेताकडे धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गोरेगाव नगर पंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भीषण होती की, संपूर्ण धान जळून खाक झाले. या घटनेत रहांगडाले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळाचा तात्काळ पंचनामा करून पीडित शेतकºयाला आर्थिक नुकसान भरपाई देऊन मदत करावी, अशी मागणी राकाँ पदाधिकारी केवलराम बघेले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही रहांगडाले यांच्या शेतातील धान पुंजण्याला अज्ञात व्यक्तीने आग लाऊन नुकसान केले होते. त्याचा शासनाने पंचनामा केला. मात्र अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. त्यात यावषीर्ही अज्ञात व्यक्तीने धानाच्या पुंजण्याला आग लावून लाखो रुपयांचे नुकसान करण्याचे काम केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *