अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया आरोपीला भंडारा जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाने आजन्म कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली. मार्कड हरीभाऊ उकरे वय ५४ वर्षे रा. खैरी / दिवान त.पवनी जि.भंडारा असे शिक्षा सुनावण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. मार्च २०१९ रोजी सांयकाळी ०४.३० वाजेच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलीच्या शाळेतील शिक्षीकेने पिडीतेच्या आईला सांगीतले की, आरोपी मार्कड हरीभाऊ उकरे याने पिडीतेला पैशाचे आमिष दाखवुन शेतावर तसेच गावचे विठ्ठल रुखमीनी मंदीरात तिच्यावर अत्याचार केले. यावर संतप्त झालेल्या पिडीतेच्या आईने आरोपीचे घरी जावुन झालेल्या प्रकरणाबद्दल विचारले असता, आरोपीने ‘माझी चुक झाली मला माफ करा!’ असे बोलला असता, पिडीतेच्या आईने पोलीस स्टेषन पवनी येथे येवुन तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन पवनी अप. क्र. ६५/१९ कलम ३७६ , ३७६ (२) भांदवी सहकलम ४, ६ बा. लै. अ. प्र. का. २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांचेकडे येताच त्यांनी सदर गुन्हयाचा तपास करुन आरोपी मार्कड हरीभाऊ उकरे यास तात्काळ अटक करुन गुन्हयात साक्षपुरावा गोळा केला.

तपासामध्ये सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपी विरुध्द विविध कलमांन्वये विशेष सत्र न्यायालय भंडारा येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले सदर गुन्हयाची सुनावणी प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश श्री. आर. जी. अस्मार यांचे न्यायालयात चालविण्यात आली. प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दुर्गा तलमले यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले. दरम्यान साक्ष व पुराव्याच्या आधारे आरोपीवरील आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपी मार्कड हरीभाऊ उकरे याला कलम ३७६, ३७६ (२)(र) (द) भां. द. वि व मध्ये आजीवन कारावास व २५ हजार रुपए दंड,दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास , कलम ६ पोक्सो कायदा २०१२ मध्ये आजीवन कारावास व २५ हजार रुपए द्रव्यदंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, पवनी पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार नितीनकुमार साठवने बं.नं. १५ यांनी योग्य पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज सांभाळले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *