गोवारी बांधवांचे न्याय व हक्काच्या लढाईत सदैव सोबत राहीन!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोवारी शहीद स्मृती दिनानिमित्त नागपूर येथील झिरो माईल परिसरातील गोवारी स्मारकाला माजी राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी अभिवादन करून १९९४ साली आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करताना शहीद झालेल्या सर्व गोवारी बांधवांप्रति आदरांजली वाहिली. याप्रसंगी आयोजित नेत्र तपासणी शिबिराला भेट देत नेत्र तपासणी देखील केली. तसेच समाजबांधवांसाठी आयोजित महाप्रसाद सेवेतही सहभाग नोंदवला. गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्या करिता अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील तत्कालीन भाजप सरकारने गोवारी समाजाच्या अडचणी शासन स्तरावर सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. डॉ परिणय फुके यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात बांधवांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी आज अनेक जण चांगल्या शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. उच्च न्यायालयातील लढाई यशस्वी झाल्यानंतर २०१८-१९ मध्ये समाजबांधवांना शैक्षणिक अभ्यासक्रमातील सवलत सुरु झाली होती. मात्र २०२०-२०२१ मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जात प्रमाणपत्र असूनही गोवारी समाज बांधवांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयात समाजबांधवांची बाजू मांडण्यात अपयश आले. त्यामुळे बांधवांना या सवलती मिळणे बंद झाले आहे. सुप्रीम कोटार्तील हा लढा अजूनही सुरु असून बांधवांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठीच्या लढाईत सदैव सोबत राहीन, असे आश्वासन डॉ परिणय फुके यांनी यावेळी गोवारी बांधवांना दिले. कार्यक्रमप्रसंगी शालीक नेवारे, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलाश राऊत, माजी आमदार मिलिंद माने, नरेश बरडे, जयदेव राऊत, सौ माहेश्वरी नेवारे, अनंत जगणीत, हेमराज नेवारे, सुरेश कोहळे, मुख्य सचिव सुरेन्द्र राऊत, दशरथ ठाकरे, संतोष वाघाडे, संजय वाघाडे, राजेंद्र शेंद्रे, बंडू गजभे, बंडू नेवारे, सुनील राऊत, अशोक नेवारे, अरुण नेवारे, विजय डोंगरे, राहुल ठाकरे तसेच समाज बांधवांची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *