लोकहिताची कामे मार्गी लावा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : ग्रामीण क्षेत्रातील सर्व स्तरातील लोकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी पंचायत समितीची यंत्रणा महत्वाची आहे.त्याकरीता संबंधित यंत्रणेने गंभीरपणे लोकहिताची कामे तातडीने मार्गी लावावे असे निर्देश आमदार नाना पटोले यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत दिले. बैठकीत केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीणांसाठी त्रासदायक ठरत असलेली नियमबाह्य कामे चचेर्चा विषय ठरली. स्थानिक स्वप्नदीप सभागृह येथे आयोजित पंचायत समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, पंचायत समितीच्या सभापती प्रणाली सार्वे, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, महीला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी, जी.प. सदस्या डॉ.मनीषा नीबांर्ते,जी.प. सदस्या सरीता कापसे, जी.प. सदस्या सुरमीला पटले, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, बिडीओ अरुण गिरेपूंजे, ठाणेदार सत्यविर बंडीवार, सर्व पंचायत समितीचे सदस्य, मंचावर उपस्थित होते.

आढावा बैठकीत केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन व जीवन प्राधिकरण अंतर्गत हर घर जल हर घर नल योजने सबंधी अनेक गावांतील सरपंचांनी झालेल्या नियमबाह्य विकास कामांची तक्रारस्वरुपी ओरड बैठकीत केली . जलजीवन च्या कामात गावातील रस्त्यांची नाल्यांची तोडफोड झाली असून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. कुणाचेही नियंत्रण नसलेल्या सदर योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी निकृष्ट दजार्ची कामे झाल्याने सरपंचांनी जलजीवन मध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आढावा बैठकीत केली.

याप्रसंगी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत विविध कामांचा आढावा घेण्यात आला. लोकहिताची कामे मार्गी लावून जनतेला सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्या यात हयगय केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तंबी आमदार नाना पटोले यांनी उपस्थित असलेल्या सर्व विभागांच्या अधिकाºयांना दिली. आढावा सभेचे संचालन विस्तार अधिकारी प्रमोद हुमने यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *