आज नवनिर्वाचित ५८ सरपंच व ४७८ सदस्यांचा मोहाडीत सत्कार सोहळा

भंडारा पत्रिका / तालुका प्रतिनिधी मोहाडी: विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या तीर्थक्षेत्र गायमुख नदीच्या तीरावर वसलेल्या सुप्रसिद्ध माता चौंडेश्वरी देवी मंदिरात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्यसाधून तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने ग्रामपंचायत सार्वत्रिक-२०२३ या निवडणुकीत निवडून आलेले सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम मंगळवार दि.२८ नोव्हेंबर २०२३ ला आयोजन करण्यात आलेले आहे. मोहाडी तालुक्यात सरपंच पदासाठी थेट जनतेतूननिवडणूक पार पडली. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या संख्येत सरपंचपद प्लस वन झाले. राज्य पातळीवर मुख्यमंत्रीपद सर्वोच्च असते. खेडेगावातील मधील सरपंचपद सुध्दा सर्वोच्च असते.छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. थेट जनतेतून सरपंच निवडणे म्हणजे जनताच सरपंच पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांनाच मतदान केले.ग्रामपंचायतीत कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त १७ सदस्य गरजेचे असतात.

आता सरपंच एक पद अधिक झाले असल्याने ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्य या मिळून ग्रामपंचायत पदाधिकाºयांची एक ने संख्या वाढली. सरपंच निवडण्यासाठीही जनतेला मतदान करावे लागले. त्यासाठी मतदारांना २ वेळा मतदान करावे लागले.एक आपल्या भागातील सदस्य निवड- ीसाठी तर दुसरे सरपंच निवडीसाठी अशी दोन वेळा मतदान करण्याची संधी मतदारांना देण्यात आली. मोहाडी तालुक्यात ५८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुक पार पडली. सदस्य संख्या ४७८ राहणार आहे तर १८४ प्रभागातून ५८ ग्रामपंचायतीचे सरपंच प्लस वन झाले. त्यामुळे ५८ ग्रामपंचायतमध्ये ५३६ पदाधिकारी विजयी झाले. मोहाडी तालुक्यातील ४७८ सदस्यपदांसाठी १ हजार १२३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात रिंगणात होते.

निवडणूकित रिंगणातील १६० सरपंचपदातील १६० पैकी ५८ तर ४७८ सदस्य निवडून आले. त्यांचा सत्कार कार्यक्रम मोहाडी येथील सुप्रसिद्ध माँ चोंडेस्वरी देवी मंदीरात मंगळवार दि.२८ नोव्हेंबर २०२३ ला दुपारी ३ वाजता भारत सरकारचे मा.केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते तर राजेंद्र जैन, नाना पंचबुधे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, जयंत वैरागडे, रिता हलमारे, सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, नेहा शेंडे, देवचंद ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार व आयोजक राजु माणिकराव कारेमोरे यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *