महाशिवरात्रीला नेरला डोंगर महादेव यात्रेला उसळली भाविकांची गर्दी

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : शिवशंभू महादेवाचा जयघोष करत भाविक निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नेरला डोंगर महादेव देवस्थान ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने हजारोंच्या संख्येने भेट देतात. या ठिकाणी असलेली विहीर व तेथील पाणी हे मुख्य आकर्षण ठरले आहे. आलेला प्रत्येक भाविक या पाण्याचा गोडवा गातो. नेरला परिसरातील शेतकरी आजही या पाण्याचा वापर करून शेतपिकाला फवारणी करतात.

अड्याळहून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरला डोंगर महादेव देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्ताने अलोट भाविकांची गर्दी पाहायला मिळते. या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अड्याळ पोलिस स्टेशन तथा नेरला डोंगर महादेव देवस्थान समिती व नेरला ग्रामस्थ बंदोबस्त व सहकार्य करतात. निसर्गरम्य व सौंदयार्ची खाण असलेला नेरला डोंगर चढताना व उतरताना भाविकांचे मन प्रसन्न होते व शांतता लाभते. नवसाला पावणाºया शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. यानिमित्ताने बंदोबस्तही लावण्यात आला होता. गर्दी होवू नये यासाठी काळजी घेण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *