दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहार संघटनेचे शल्यचिकित्सकांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : दर बुधवारी आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग बांधवांची दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी तपासणी करण्यात येते. त्यावेळी दिव्यांग बांधवाना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत असून येणाºया अडचणी आपण आपल्या स्तरावरून सोडविण्यात याव्या अश्या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. ५) ला जिल्हाध्यक्ष रवी मने यांच्या नेतृत्वात जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले. निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये दिव्यांग बांधवाना येणाºया रुग्णालय परिसर ते तपासणी कक्षापर्यंत जाण्यासाठी व्हील चेयर मदतनीसासह उपलब्ध करून देण्यात यावे, रुग्ण संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून येत असल्यामुळेत्यांना ओपीडी कार्ड देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.
तसेच ओपीडी कार्ड काढण्याची मुदत दुपारी १ वाजता पर्यंत करण्यात यावी, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तपासणी कक्षाबाहेर दिव्यांग बांधवाना बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, तपासणी साठी येणाºया रुग्णांना पिण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासणी कक्षाजवळ करण्यात यावी, रुग्णालय परिसरात प्रसाधन गृहाची व्यवस्था करण्यात यावी, येथील प्रसाधन गृहाची अत्यंत दयनीय अवस्था असून त्या प्रसाधन गृहात जाने कठीण आहे, रेल्वे कन्सेशन कॅम्प दर बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात लावण्यात यावे, दिव्यांग बांधवाना रेल्वे सवलत मिळण्यासाठी नागपूर येथील रेल्वे कार्यालयात जावे लागत असते यात दिव्यांग बांधवाना मोठी अडचण निर्माण होत असते तसेच दिव्यांग तपासणी शिबीर सर्व तालुका स्तरीय रुग्णालयात करण्यात यावी, अश्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, लाखनी तालुका अध्यक्ष सुनील कहालकर, तुमसर तालुका अध्यक्ष जितेंद्र नागदेवे, अर्जुन भिवगडे, ओमदेश इलमे, कुणाल मिसार, स्वप्नील वाणे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *