मनोहर भिडेंच्या आक्षेपार्ह विधानांचा राकाँतर्फे निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, २ आॅगस्ट रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू व साईबाबा यांच्याबद्दल मनोहर भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहिर निषेध करून भिडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.

माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयापासून राजलक्ष्मी चौकपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. राजलक्ष्मी चौक स्थित सर- दार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महापुरुषांचा अपमान करणाºया मनोहर भिडे याला अटक करा अश्या घोषणा देत निषेध करण्यात आला. दरम्यान महापुरुषांचा अपमान करून समाजात असंतोष निर्माण करणाºया मनोहर भिडे याला लवकरात लवकर अटक करण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी प्रभाकर दोनोडे, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, विशाल शेंडे, रफिक खान, अशोक सहारे, केतन तुरकर, मनोज डोंगरे, मोहन पटले, डॉ अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, डॉ. अजय उमाटे, विनीत सहारे, सचिन शेंडे, निरज उपवंशी, अजय लांजेवार, राजू एन जैन, बिसराम चर्जे, अशोक गोस्वामी, रमेश रहांगडाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *