‘व्हॉट्सअप’वर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हॉटसअ‍ॅपवर टाकू नये, असे नियम असतांनाही दोघां जणांनी हे कृत्य केल्यामुळे त्यांना गोंदिया शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या जवळील ग्राम नंगपुरा मुर्री येथील दोन ग्रामस्थांनी वेगवेगळ्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुप वर १३ नोव्हेंबरला रात्री दरम्यान दोन धर्मात वा दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट लोड केल्यामुळे नंगपुरा येथील ग्रामस्थांत रोष निर्माण झाला असून याबाबतची तक्रार करण्याकरिता १४ नोव्हेंबर मंगळवार ला नंगपुरा मुर्री येथील काही ग्रामस्थां सोबत तिर्थराज हरिणखेडे व कुलदीप रिनाईत यांनी सदर पोस्ट मुळे दोनसमाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट भाजप जि.प. पिंडकेपार व जंगपुरा मुर्री अश्या दोन व्हॉटसप ग्रुप वर आक्षेपार्य पोस्ट टाकली. त्यामुळे नंगपुरा मुर्री येथील गावात काही काळापुरता तणाव निर्माण झाला होता. दरम्यान गावातील मुख्य चौक असलेल्या ग्रामपंचायत समोरील परिसरातील दुकानं बंद करण्यात आले. लगेच गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकसुर्यवंशी यांनी आपल्या ताफ्यासह नंगपुरा मुर्री गाठली व घटनास्थळी दाखल होत. परिस्थिती हाताळली. व या प्रकरणी नरेंद्र मेश्राम वय ५२ वर्ष रा. मुर्री व सिद्धार्थ नांदगाये वय ४२ रा. मुर्री अश्या दोघां व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून या संदर्भात विचारपूस केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुर्यवंशी बोलतांना म्हणाले. दरम्यान तणावातील वातावरणात काही तरूणांनी ग्रामपंचायत समोरील चुटिया रोड वर टॉयर ची जाळपोळ केली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सध्या तणाव निवळण्याकरिता गावातील मुख्य चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये करिता पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *