अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर व ट्रॅक्टर तिरोडा पोलिसांचे ताब्यात

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : गस्तीवर असलेले पोलिसांना मिळालेले गुप्त माहितीनुसार अवैधरित्या वाहतूक करणारे रेतीचे टिप्पर व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालक व मालका विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार दिनांक ५ आॅक्टोबर चे रात्री गस्तीवर असलेले उप पोलीस निरीक्षक चिरंजीव दलालवाड, पोलीस शिपाई विदेश अंबुले, शैलेश दमाहे, वाहन चालक अख्तर शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अर्जुनी कडून तिरोडा कडे अवैधरित्या रेती भरून टिप्पर जात असल्याचे माहितीनुसार त्यांनी हि माहिती पोलिस निरीक्षक देविदास कठाळे यांना देऊन त्यांचे सुचनेनुसार दिनांक ६ आॅक्टोबरचे पहाटे दरम्यान राणी अवंतीबाई पुतळा तिरोडाजवळ सापळा लावला असता अर्जुनी कडून तिरोडाकडे येत असलेले टिप्पर क्रमांक एम. एच.४० सीडी.०५६२ ला थांबवून चालकाला विचारपूस केली असता त्याने आपले नाव साहिल नवाज अली सय्यद (२३ वर्ष) राहणार काचेवानी व मालक सौरभ चव्हाण तिरोडा असे सांगितले.

त्यास वाहतुकीचे परवाना बाबत विचारपूस केली असता त्याने आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा रेती वाहतुकीचा परवाना नसून आपण ही रेती अर्जुनी घाटावरून भरून आणणल्याचे सांगितल्यावरून पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केला. याप्रकरणी चालक साहिल नवाज तसेच मालक सौरभ चव्हाण यांचे विरोधात भादंवी कलम ३७९,३४ नुसार गुन्हा नोंद केला असून याच दिवशी भबोडी अंडरब्रिज जवळुन एम.एच. ३५ जी. ६४०५ क्रमांकाचा ट्रॅक्टर रेती भरून येत असल्याचे दिसल्यावर ट्रॅक्टर थांबवून चालकास विचारपूस केली असता त्याने आपले नाव शैलेश आनंदराव कडव राहणार चांदोरी खुर्द व ट्रॅक्टर मालक जितेंद्र सुखदेव नरोले राहणार चांदोरी खुर्द असे सांगितले व आपण ही रेती चांदोरी घाटावरून आणली असून आपले कडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितल्यावरून ट्रॅक्टर चालक व मालका विरोधात भादंवि कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.