गुड्डु बोपचे यांचे तिरोड्यात जंगी स्वागत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सामील झाल्यानंतर पहिल्यांदा तिरोडा येथे आलेले गुड्ड बोपचे यांचे तिरोडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. मागील अडीच महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षात फूट पडून प्रफुल पटेल व अजित पवार यांनी शरद पवार गटापासून वेगळी चूल थाटुन भाजपाशी हातमिळवणी केल्याने गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संभ्रमात होते ज्यामुळे माजी खासदार खुशाल बोपचे व त्यांचे पुत्र गुड्डू बोपचे यांचे कडे सतत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते विचारणा करीत असल्याने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन गुड्डू बोपचे यांनी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते अल्पसंख्याक व आदिवासी बांधवांशी चर्चा करून त्यांचे इच्छेनुसार मुंबई येथे शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही आपले सोबत असल्याची ग्वाही दिल्यानंतर आज तेरा रोजी पहिल्यांदाच तिरोडा येथे आलेले गुड्डू बोपचे यांचे तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.