आंभोरा पुलावरून लवकरात लवकर रहदारी सुरु करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येत्या आठ दिवसावर येवून ठेपलेल्या नवरात्रीनिमित्त आंभोरा येथे दर्शनासाठी भंडारा जिल्ह्यातील अनेक भाविक जात असतात, मात्र नविन पुल अद्यापही सुरु न केल्याने भाविकांना दर्शनासाठी जाण्यास अडचणीचे होणार असूने रहदारीस पुर्णपणे तयार असलेल्या आंभोरा पुलावरुन लवकरात लवकर रहदारी सुरु करावी, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रसच्या वतीने नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आज ६ आॅक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार पुलाचे बांधकाम पुर्ण झाले. परंतु जाणुनबजुन वेळ मारुन नेण्यासाठी एक एक काम वाढविण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचे बेहाल होत आहेत. रात्र थोडी पण सोंग फार अशी स्थिती आपल्या विभागाकडून होत असताना दिसत आहे. पुलाचे काम पुर्ण करण्याची मुदत संपुण दोन वर्ष झाले. पण त्या कंपनीवर कोणतीच कार्यवाही होत नाही. आपण जाणुनबजुन कंपनीला प्रत्येक्ष मदत करत असल्याचे दिसुन येत आहे.

सणासुदीच्या काळात सुध्दा आपल्या विभागाने जनतेला फार त्रास दिला आहे. आता लवकरच नवरात्र उत्सव मौदी नदी घाटावरील दुर्गा मंदिरात साजरा होणार आहे. करिता १४ आॅक्टोबर २०२३ पुर्वी पुलावरून रहदारी सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालयात दि. १४ आॅक्टोबर २०२३ पासून ठिय्या व आंभोरा पुलावर जोरदार आंदोलन करण्यात येईल व होणाºया दुष्परिणामास सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर जबाबदार राहील, अशी तंबी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदनाची प्रतिलिपी भंडाराचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हाधिकारी नागपूर, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी काँग्रेस पार्टीचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मारोती आजबले, पुजा बालु ठवकर, पहेला जि.प.सदस्या कविता जगदीश उईके, सिल्ली जि.प.सदस्या अनिता एकनाथ भुरे, पंचायत समिती सदस्या पहेला काजल अजय चवळे, पंचायत समिती सदस्या चोवा सिमा नरेंद्र रामटेके, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव स्वप्नील गुणवंत आरीकर आदी प्रामख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *