गरम पाणी वाटप करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविणाºया भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) गावाने आता वृक्षतोड थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी ६ वाजल्यापासून गावकºयांना मोफत गरम पाणी पुरविले जात आहे. आट दिवसापुर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ गावातील १२० कुटुंब घेत असून संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाची चर्चा आहे. लाखनी तालुक्यातील रेंगेपार ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. ग्रामपंचायतीला २०११ मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे राज्यातून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. तसेच स्मारक ग्राम योजनेचे बक्षीसही मिळाले आहे. लहान मोठे अनेक पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकाविले आहे. पर्यावरण संवर्धनसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या १०० एकर परिसरात वृक्ष लागवड केली आहे. थंडीच्या दिवसात पाणी गरम करण्यासाठी अतिरिक्त सरपण लागते. त्यासाठी वृक्षतोड होऊ नये म्हणून आता ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

सरपंच मनोहर बोरकर यांच्या पुढाकाराने सोलर वॉटर हिटर सयंत्र लावण्यात आले आहे. त्यासाठी दोन लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक एच. व्ही. लंजे यांनी दिली. दीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे आहे. सोलर पॅनलद्वारे पाणी गरम होते. सकाळी ६ वाजल्यापासून १२० कुटुंबाना गरम पाणी मोफत दिले जाते. यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही. गृहकर व पाणीपट्टी करातून याचा खर्च भागविला जात आहे. रेंगेपार कोहळी गावाची लोकसंख्या १८७९ असून १२० कुटुंब येथे राहतात. संपूर्ण गावकºयांचा या उपक्रमात सहभाग आहे. गरम पाणी तेही मोफत मिळत असल्याने सकाळपासूनच रेंगेपार येथील नागरिकांची गर्दी होते. ग्रामपंचायतीच्या परिसरात लावलेल्या या सयंत्रातून गरम पाणी नेण्यासाठी महिला पुरुष गर्दी करून असतात. सकाळी ६ ते १० असे चार तास गरम पाणी दिले जाते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *