जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ नोव्हेंबर, २०२२ जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडाराच्या प्रांगणात कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रूग्णालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग, कामगार कार्यालय, उप प्रादेशीक परिवहन, पंचायत समिती, अपंग महामंडळ, तहसील कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र ई. विविध शासकीय कार्यालयामार्फत जनतेला विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने स्टॉल लावण्यात आले होते. असे एकूण ४० स्टॉल लावण्यात आले होते. शिबीराची सुरूवात सकाळी १०.३० वाजता व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना रोपटे देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून महेश आव्हाड, अपर जिल्हाधिकारी, भंडारा, ईश्वर कटकडे, अपर पोलीस अधिक्षक, भंडारा, डॉ. कार्तिक पन्नीकर, प्रभारी प्राचार्य, जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा तसेच कार्यक्रमाचे आयोजक बिजु बा. गवारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व आर. बी. वाढई, अध्यक्ष, जिल्हा अधिवक्ता संघ, भंडारा तसेच भंडारा जिल्हयातील सर्व माननीय न्यायीक अधिकारी, जिल्हा वकील संघ, भंडाराचे अधिवक्तागण, जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच जिल्हा न्यायालय, भंडारातील सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच शासकीय योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी प्रत्येकाला आपल्या अधिकारांची जाणिव असणे आवश्यक आहे. म्हणून या महाशिबिराच्या माध्यमातून आपले अधिकार तसेच विविध शासकीय योजनांबाबत माहिती करून घ्यावी. सर्व पात्र नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. तसेच जिथे सामान्य नागरिकाचा हक्क हिरावला जात असेल किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल तर विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधन्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक बिजु बा. गवारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी केले. यावेळी त्यांनी विधी सेवा शिबिरांद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान दिनांक ३१ आॅक्टोबर पासून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच, तालुका विधी सेवा समिती तसेच शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांना कायदेविषयक तसेच त्यांचे हक्काबाबत जाणीव करून देणे या अभियानाचा उद्देश आहे असे सांगितले.

महेश आव्हाड, अपर जिल्हाधिकारी, भंडारा यांनी शासकीय योजना सामान्य नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी तसेच कर्मचा-यांची असून त्यासाठी त्यांनी गावोगावी भेट देवून ते त्यांना मिळवून देण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन ए. के. आवारी, मुख्य न्यायदंडाधिकारी, भंडारा तर आभार प्रदर्शन पी. पी. देशमुख, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भंडारा ( जलदगती न्यायालय ) यांनी केले व उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देवून शासनांमार्फत राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. त्याच पाठोपाठ जनतेनी सुध्दा स्टॉलला भेट देवून शासनाच्या योजनांची माहिती घेतली. सर्व शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती पॉम्पलेट, बुकलेटच्या माध्यमातून जनतेला प्रत्येक स्टॉलवर मिळत होती. सदर शिबिरात प्रत्येक योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला. शिबिराचा समारोप दुपारी ३.०० वाजता करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्याकरिता सर्व शासकीय कार्यालयांनी मोलाचे योगदान देवून महत्वाची भूमिका बजावली. एकंदरीत लोकांच्या दृष्टीने या शिबिराचे महत्व फार होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक श्री. पी. यु. बान्ते, वरिष्ठ लिपिक श्री. पी. एम. साखरकर, कनिष्ठ लिपिक श्री. मोहन हुंडरी, श्री. दिनेश सावळे, श्री. प्रशांत कुभारे तसेच शिपाई श्री. नितेश गोन्नाडे, श्री. विनीत जांभूळकर, कु. मयुरी वासनिक तसेच न्यायालयीन कर्मचारी व विधी स्वयंसेवकांनी सहकार्य केले. अशाप्रकारे एकंदरीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *