मोहाडी-कान्हळगाव रस्त्याची दुरावस्था

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून तयार करण्यात आलेल्या मोहाडी-कान्हळगाव रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली असल्याने या रस्ता कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करुन रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या विशाखा ईश्वर ढबाले यांनी केली आहे. सन २०१७ – १८ मध्ये मोहाडी ते कान्हळगाव रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मोहाडी-कान्हळगाव रस्त्याचे काम(टी.आर.३)किमी ०/०० ते ५/२०० रस्त्याची मंजुर लांबी ५ /२०० किमी आणी मंजुर निविदा किंमत २ करोड २५ लक्ष ७८ हजार रुपये अंदाज पत्रकाचे होते. यामध्ये सी डी वर्क, नाली बांधकाम, सिमेंट रस्ता, खडिकरण करून त्यावर डांबर रस्ता तयार करणे ईत्यादी कामाचा समावेश होता. सर्वप्रथम सी डी वर्क चे काम करण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या पायल्या, अल्प प्रमाणात सिमेंट, धूळमिश्रित गिट्टि, माती मिश्रित वाळू(भसवा)वापरून सी डी वर्कचे काम करण्यात आले. जिथे गरज होती, तिथे न बांधता दुसºयाच ठीकाणी बांधण्यात आले. त्यामुळे विनाकारण इकडून तिकडे वाहून जाणाºया पाण्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.सिमेंट रस्ता तयार करतानी पूर्वी चुरी खडी मिश्रित रस्त्यावर पसरवावी लागते,नंतरच सिमेंट रस्तयाचे बांधकाम करावे लागते. या ठीकाणी अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्यात आले नाही, परीणामी सिमेंट रस्त्याला मोठंमोठ्या भेगा पडल्या. नालीचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने नाली जागोजागी फुटली असून पाणी वाहून जाने थांबले आहे.

डांबर रस्ता तयार करण्यापूर्वी दोन, तीन थर देवुन खडीकरनाचे काम मोठे मजबूत करावे लागते, मात्र चकोले नामक ठेकेदाराने या ठीकाणी खडीकरनाचे काम निकृष्ट दर्जाचे करून डांबर रस्त्याचे काम सुरू केले. डांबर रस्तयाच्या कामात मोठ्या प्रमाणात आॅईल वापरून डांबर रस्ता कमी दिवसात तयार करण्यात आला. त्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. दररोज रस्त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्याने चालतानी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाच वर्षापर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा करारनामा लिहुन देवुनही ठेकेदार रस्त्याच्या दुरुस्ती कडे कानाडोळा करीत आहे. दुरुस्ती तर सोडा, पाच वर्ष होत आले तरी सदर ठेकेदाराने या रस्त्याकडे साधे ढुंकूनही पहिले नाही रस्त्याची दुरावस्था बघता संबधीत विभागाने सदर कंत्राटदाराला रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावे, आठ दिवसात रस्ता दुरुस्तीला सुरूवात झाली नाही तर रास्ता रोको करण्यात येईल,अशा ईशारा सामजिक कार्यकर्त्या विशाखा ईश्वर ढबाले यांनी दीला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *