मुख्य मार्गावरील गिट्टी उखडल्याने अपघातांची शक्यता

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : रस्ते हे विकासाची लाइफलाइन समजल्या जाणा-या रक्तवाहिन्या आहेत. रस्ते, मुख्य मार्ग, महामार्ग चांगले तर विकास झाल्यासारखे वाटते. पालांदूर ते अड्याळ राज्यमार्ग क्रमांक ३५८ या मुख्य मार्गावर लाखनी तालुक्यातील किटाडी परिसरात किटाडीपासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर अड्याळकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर नवनिर्मित डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर गिट्टी उखडल्याने अपघातांची संख्या बळावली आहे. किरकोळ अपघातही घडले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. किटाडीमार्गे अड्याळ हा मार्ग जिल्हा महामागार्ला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. हा मुख्य मार्ग अत्यंत वर्दळीचा रस्ताअसून, रात्रं-दिवस या मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहने धावत असतात. गत तीन-चार महिन्यांपूर्वीच किटाडीपासून पुढे पाच किलोमीटर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र, किटाडी परिसरालगत दीड किलोमीटर अंतरावर एक ते दीड महिन्यापासून डांबरीकरण फुटले असून, गिट्टी उखडून माती बाहेर दिसू लागली आहे. रस्त्यावर खाचखळगे पडले आहेत.

परिणामी, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नवीन वाहनचालकांना जागेवरील खाचखळगे नजरेस येत नसल्याने चारचाकी वाहने अनियंत्रित होत आहेत. तर उखडलेली गिट्टी व खाचखळग्यातून दुचाकी उसळून किरकोळ अपघातही घडले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊनकळविले आहे. मात्र, अद्याप दखल घेतली नसल्याने अजूनही समस्या कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने दखल घेत त्या जागी नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी आहे.

किटाडीनजीकच्या तिरखुरी येथील रहिवासी असून, चार-पाच दिवसांपूर्वी सकाळी आठ वाजता आपल्या दुचाकीने सासूसोबत भंडारा येथे लग्नकायार्साठी जात होतो. दरम्यान, किटाडीपासून पुढे एक-दीड किलोमीटर अंतरावर उखडलेल्या डांबरीकरणाच्या खाचखळग्यांतून दुचाकी उसळून दुचाकीवर मागे बसलेली सासू खाली पडून जखमी झाली. नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाचखळगे त्वरित बुजवून मार्ग सुस्थितीत करण्यात यावा.

प्रमोद निंबार्ते, दुचाकीस्वार, तिरखुरी.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.