मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार दोनशे कोटी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपुजन!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये मोठा योगदान राहिला आहे. मुख्यमंत्री पदावर आसीन होण्यापूर्वीसुद्धा त्यांनी भंडारा जिल्ह्याला कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन विकास कामे करण्यास प्रेरित केले आणि असाच प्रतिसाद मुख्यमंत्री झाल्यावरही देत आहेत. ना. एकनाथ शिंदे यांच्याद्वारे भंडारा जिल्ह्याला देण्यात आलेल्या २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते करण्यात येणार आहे, ज्या करिता येत्या १२ नोव्हेंबर २०२२ ला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या सह जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आगमन भंडारा येथे होत असल्याची माहिती आ. नरेंद्रभोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ.भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना पुढे सांगितले कि मुख्यमंत्री महोदय यांनी २०० कोटी पेक्षा अधिकची निधी भंडारा जिल्ह्याच्या विकास करिता दिली आही. विकास म्हणजे केवळ रस्ते नाल्या बांधणे नसून शिक्षा, स्वास्थ्य हे अधिक आवश्यक आहे. ज्या करिता विधान सभा क्षेत्रातिक बुद्ध विहारात अधात्म्य सोबत शिक्षणाचा साथ मिळावा या करिता अत्याधुनिक ई लायब्ररी व शाळांचे आधुनिकीकरण सोबतच क्षेत्रातील रुग्णालयांना सुविधा देण्यात येणार आहेत. मा. मुख्यमंत्री साहेबांनीदिलेल्या निधी चा उपयोग करून सुरु करण्यात येणाºया कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करिता १२ नोव्हेंबर ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होत असून त्यांच्या द्वारे नाशिक नगर येथील बुधविहारातील ईलायब्ररी चे उद्घाटन करण्यात येणार आहे. याच दरम्यान शास्त्री चोक येथील हुतात्मा स्मारक, खांब तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात येईल. ज्या नंतर खात रोड स्थित रेल्वे मैदानात सभेचे आयोजन केले असून या अगोदर भूमिगत गटारी योजनेचे भूमिपूजन केले जाईल. या वेळी जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संखेने उपस्थित राहण्याचे आव्हान आ. नरेंद्र भोंडेकर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.