ंअखेर श्रावणकर यांचे ‘आधारनेच’ केले अंत्यसंस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ‘जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे,जो आपुले; तोचि साधू ,देव तेथेच जाणावे…… ,हा अभंग सर्वच ऐकतात. मात्र, याचा प्रत्यक्ष जीवनात फार कमी जन अवलंब करतात.आपण कुत्र्या-मांजरांचे ही लाड करतो.त्याची काळजी घेतो,पण त्यांना मिळतो तसा साधा तुकडाही ज्यांच्या वाट्याला येत नाही, रस्ताच्या कडेला भीक मागणारे यांचे दर्शन होते.अशा भिकारीचे अवस्था पाहून त्यांना कधी अच्छे दिन येतील काय,असा प्रश्न निर्माण निर्माण होत असतांनीच वृध्दापकाळी पोटच्या गोळ्याने नाकारलेल्या बेघर,वृध्द, निराधार आणि भिकारी यांच्यासाठी शहरातील गांधी विद्यालय परीसर,राजगोपालाचारी वार्ड, भंडारा येथिल आधार शहरी बेघरांसाठी निवारा केंद्रात क्रांती वार्ड भंडारा येथिल बेघर असलेल्या देविदास श्रीराम श्रावणकर यांना दोन वर्षाअगोदर आधार देवून संस्थेचे काळजीवाहक कुटूंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत होते.अचानक १जानेवारी २०२३ ला देविदास यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण कर्मचारी वर्ग हळहळला, त्यांच्या नातेवाईकांना संदेश देवून अखेर आधारनेच, आधार नसलेल्या देविदासचे अंतिमसंस्कार करुन माणुसकिचा वसा जपला.

यावेळी परीवारातील सदस्य मुकंदा श्रावणकर,पुष्पकूमार श्रावणकर, सुनिल श्रावणकर यांच्या उपस्थितीत मनमिळावू असलेल्या स्व.देविदास श्रावणकर यांना एन.एम.डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बबन मेश्राम,बेघर निवारा केंद्र न.प चे मुख्यधिकारी व प्रकल्प अधिकारी विनोद जाधव, उपमुख्यधिकारी कु.अश्विनी चव्हाण, कौशल्य वरोजगार केंद्राचे व्यवस्थापक प्रविण आर. पडोळे,निवारा व्यवस्थापक व संचालक मोहनिष नागदेवे ,काळजी वाहक निखील मसराम , लाभार्थी दत्तू साखरकर, विजू शहारे, लोकचंद लिमजे,सहादेव वरवाडे, सुरेश चेटुले,रामदास शहारे,ईस्तार गिरणवाडे, प्रकाश माहेलो,प्रमोद वाघमारे, महादेव मेश्राम,यंशवतराव बावणे,सह करर्मचारी साहिल मेश्राम, रोशन खंगार,नूतन कुरंजेकर,सुर्यकांत वाडिभस्मे,सूरज वाहणे यांनी श्रद्धांजली देवून दु:ख व्यक्त केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *