राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंब्यावर निघणार तोडगा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर होणा?्या वाहतुकीच्या खोळंब्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित विधीध विभागांच्या प्रमुखांची बैठक बोलून ठोस तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पुढील आठ ते दहा दिवसात हा प्रश्न निघाली काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना होऊन त्या प्रत्यक्षात अमलात आणण्यात असे निर्देश यावेळी खासदारांनी उपस्थित अधिका?्यांना दिले. मागील काही दिवसांपासून भंडारा शहरातून जाणा?्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होताना दिसत आहे. कारधा चौक ते नागपूर नाका चौक यादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची अवस्था मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.

याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांनाही बसतो. दिवसागणिक वाढतअसलेल्या या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने गांभीर्य पूर्वक विचार करून आज खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि राष्ट्रीय महामागार्चे काम करीत असलेल्या कंत्राटदारांची संयुक्त बैठक बोलावली. वाहतुकीची समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत काहीतरी तात्पुरत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशावेळी कारधा चौक ते नागपूर नाका यादरम्यान तात्पुरते रस्ता दुभाजकतयार करण्यात यावे, वाहतुकीसाठी अडचणीचे ठरणारे राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारचे अतिक्रमण काढले जावे, पोलीस कर्मचा?्यांची संख्या वाढवून वाहतूक नियंत्रित केली जावी आणि अन्य वाहतुकीसाठी अडचणीच्या ठरणा?्या बाबींचा शोध घेऊन त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी निर्देश या बैठकीत खासदारांनी दिले.

प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. या उपायोजना प्रत्यक्षात आणून वाहतुकीचा मार्ग सुकर करावा. दरम्यान या अनुषंगाने आढावा घेण्याच्या दृष्टीने पुन्हा एक बैठक घेतली जावी असे निर्देश यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी जिल्हाधिकारी पाटील, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *