धान मळणी करताना ट्रॅक्टरसह मशीन व धानाचे ढीग जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : धान पिकाच्या मळणीसाठी धानाच्या ढिगाला ट्रॅक्टर लावून धान मळणी मशीनने मळणी करीत असताना अचानक ट्रॅक्टरला लागलेल्या आगीत ट्रॅक्टरसह ४ एकरातील धान पिकाचे ढीग जळून खाक झाल्याची घटना घडली. तर धान मळनी मशीनही आगीत सापडल्याने मळणी मशीन देखील अंशत: जळल्याची घटना घडली. सदर घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील रोहनी शेत शिवारात घडली. या घटनेत स्थानिक रोहणी येथील आनंदराव समरीत नामक शेतकºयांच्या लाखो रुपयांच्या ट्रॅक्टरसह ४ एकर क्षेत्रातील धानाचे पुंजणे पूर्णत: जळून धान मळणी यंत्र अंशत: जळले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, घटनेतील शेतकरी आनंदराव यांची स्थानिक रोहनी शेतशिवारात मालकी ४ एकर शेत जमीन आहे. या शेतीत आनंदरावनेखरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती. मागील काही दिवसांपूर्वी धान पिकाची कापणी करून शेतशिवारातच मळणीसाठी धानाचे पुंजणे केले होते. तथापि, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास आनंदरावने स्थानिक रोहणी येथील काही मजुरांच्या सहाय्याने धान मळणीसाठी मालकी शेत शिवारात मालकी ट्रॅक्टर व धान मळणी मशीन घेऊन पोहोचले होते.

शेत शिवारात पोहोचल्यावर मजुरांनी ट्रॅक्टरवर धान मळणी मशीन लावून धानाची मळणी सुरु केली होती. यावेळी अचानक ट्रॅक्टरसह मळणी मशीनला आग लागली. यावेळी मजुरांनी मळणी मशीनची आग विझवुन ट्रॅक्टरला मशीनपासुन दुर करीत ट्रॅक्टरलालागलेली आग विझविण्याचा देखील प्रयत्न केला. माञ ट्रॅक्टरला लागलेल्या आगीच्या झळांनी ट्रॅक्टरसह धान पुंजणे पुर्णत: जळुन खाक झाले. तर धान मळणी मशीन अंशत: जळाली आहे. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. या दुर्घटनेत पीडित शेतकºयाच्या लाखो रुपयांच्या ट्रॅक्टर व धान मळणी यंत्रासह ४ एकरातील धान पुंजणे जळून खाक झाल्याने शेतकºयाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह परिसरातील शेतकºयांनी व मजुरांनी घटनास्थळी पोहोचत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तथापि धान पिकाची मळणी करताना अचानक लागलेल्या आगीने घटनेतील पीडित शेतकºयाचे ४ एकरातील धान पिकासह ट्रॅक्टर व धान मळणी मशीन जळून खाक झाल्या प्रकरणी शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *