हत्या करणाºया तिघांना चार तासात अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : देवरी तालुक्यातील तुमडीखेडा येथे १९ सप्टेंबर रोजी इसमाची हत्या करणाºया तीन आरोपींना चिचगड पोलिसांनी चार तासात अटक केली. दिलीप अरकरा रा. तुमडीखेडा असे मृतकाचे नाव असून रतीराम कुंभरे, छेदीलाल आचले व मोतीराम नेताम सर्व रा. तुमडीमेंढा असे आरोपींची नावे आहे. तुमडीखेडा येथील पुष्पा अरकरा यांचे पती दिलीप अरकरा हे १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांनी चिचगड पोलिसात तक्रार केली होती. दरम्यान १९ सप्टेंबर रोजी तुमडीखेडा शिवारातील जंगलातील नाल्यात त्यांच्या पतीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच चिचगड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतक दिलीप अरकरा यांच्यावर हत्याराने वार करुन गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने अज्ञात आरोपींनी त्याच्या कंबरेला मोठा दगड बांधून नाल्यात फेकल्याचे आढळले. दरम्यान पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तपासात संशयाच्या आधारे रतिराम कुंभरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने छेदीलाल आचले व मोतराम नेताम याच्या मदतीने मृतकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन कुºहाडीने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, चिचगडचे सहायक पोलिस निरीक्षक शरद पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे, सहायक फौजदार हुर्रे, पोलिस हवालदार मसराम, अंबुले, गायकवाड, पोलिस नायक सुधाकर शहारे, कमलेश शहारे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.