सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक विश्वासराव देशमुख यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : सेवानिवृत्त पोलीस उप अधिक्षक श्री विश्वासराव देशमुख यांचे आज सकाळी दु:खद निधन झाले. गेली पंधरा दिवस ते स्ट्रोक च्या उपचारार्थ नानावटी रुग्णालयात होते. आयुष्यात नेहमीच प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष त्यांनी केला. अगदी मृत्युशीसुद्धा त्यांनी तेरा दिवस संघर्ष केला. १५ फेब्रुवारी १९४० साली, पारध सारख्या छोट्या गावात, अत्यंत गरीब अशा शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शेतीत कष्ट करत करत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. काही काळ गावातीलच शाळेत शिक्षक म्हणून काम केले.त्यानंतर औरंगाबाद येथे नोकरी शोधत ते आले. संयोगाने त्याचवेळी चालु असलेल्या पोलिस भरतीत ते शिपाई म्हणून भरती झाले.अभ्यासु आणि मेहनती असल्याने त्यांना नेहमी उच्च प्रशिक्षणासाठी शासनाने ठिकठीकाणी पाठवले. यांत हैदराबाद येथील पोलीस प्रशिक्षण महत्त्वाचे होते. पोलीस शिपाई, मग हेड कॉन्स्टेबल, फौजदार, पोलीस सबईन्स्पेक्टर, सिनीयर पोलीस ईन्स्पेक्टर, पोलीस उपअधीक्षक होउन ते १९९८ साली हिंगोलीत सेवानिवृत्त झाले.

कायद्याचा गाढा अभ्यास असल्याने कायदेशीरपणा मनात मुरलेला . जनतेची सेवा हाच धर्म. जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांनी नेहमीच यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना खुप प्रेम आणि सन्मान मिळाला. औरंगाबाद, जालना, नांदेड, बदनापूर, उमरगा, बीड, अंबाजोगाई, माजलगाव, मंठा, लातुर, कासारशिरशी , मनमाड, मुंबई येथे त्यांनी सेवा प्रदान केली. त्यांनी काही काळ मराठवाडा विभागाचे पोलीस अधीक्षक, सीआयडी हे पद ही भूषविले. आपल्या तत्त्वनिष्ठ स्वभावामुळे त्यांच्या अनेक बदल्याही झाल्या. हसतमुखाने ते सगळे पदरात घेत ते चालत राहिले. आपल्या कर्मचारीवर्गाला ते नेहमीच मार्गदर्शन आणि मदत करण्यास तयार असत. आपल्या अधिन असलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गात ते नेहमीच आवडते बॉस होते .त्यांना प्रेमाने सर्व “आबासाहेब” म्हणत. आज त्यांची येशासवी ईहलोकातील यात्रा संपूर्ण झाली. मागे राहीले त्यांचे आदर्श. त्यांच्या मागे त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी, त्यांचे दोन सुपुत्र, सुना, त्यांची कन्या आणि जावई आहेत. त्यांचे जावई श्री. विजयकुमार काळम पाटील हे सेवानिवृत्त भा. प्र. से. सनदी अधिकारी व आता महाराष्ट्र शासनाच्या महाप्रित कंपनीत संचालक आहेत. त्यांचे मोठे सुपुत्र श्री राजेंद्र देशमुख हे उद्योजक आहेत. तथा छोटे सुपुत्र संजय देशमुख हे आयकर विभागात कमिश्नर अपिल्स या पदावर मुंबई येथे कार्यरत आहेत .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *