५,२२० मेगावॅट क्षमतेच्या सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महानिर्मितीचे तीन सामंजस्य करार संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : औष्णिक वीजनिर्मितीत देशातील अग्रेसर कंपनी असलेल्या महानिर्मितीने राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आज अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात दमदार पाऊल टाकले असून वैविध्यपूर्ण असे तीन सामंजस्य करार केले आहेत. ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार केले. एकूण ५,२२० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्प नियोजनाद्वारे राज्यातील विविध ठिकाणी सौर-उदंचन जलविद्युत (पंप स्टोरेज पद्धतीचे) आणि पवन ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पांना सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे आज रोजी मा. ना. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात महानिर्मितीने मे एस जे व्ही एन मर्यादित (पूर्वाश्रमीची सतलज जल विद्युत निगम मर्यादित) यांचेशी सुमारे ५,००० मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, महाऊर्जा यांचेशी १२० मेगावॅटचे सौर व पवन ऊर्जा प्रकल्प तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, प्रोत्साहन देण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण असून त्यास अनुसरून महानिर्मितीने हे करार केले आहेत.

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या आजच्या या कार्यक्रमास ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उप मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय राहुरी यांचेसमवेत १०० मेगावॅट क्षमतेचे सौर संचालक डॉ. पी. अन् बलगन, महापारेषणचेअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, मराविमं सुत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, प्रामुख्याने उपस्थित होते. तिन्ही सामंजस्य करारांवर महानिर्मितीचे वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मे एस जे व्ही एन मर्यादित यांच्या वतीने श्रीमती गीता कपूर, प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी स्वाक्षरी केली.

तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे वतीने कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी तर महाऊर्जाचे वतीने डॉ. पी. अन् बलगन यांनी स्वाक्षरी केली. महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीस्वाक्षरी करून महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील एका अभिनव घटनेची नोंद केली. बाळासाहेब थिटे, संजय मारुडकर, अभय हरणे, राजेश पाटील तसेच अन्य वरिष्ठ याप्रसंगी महानिर्मितीचे संचालकवृंद अधिकारी उपस्थित होते.

करारांची वैशिष्ट्ये :- राहुरी विद्यापीठाच्या ४०० एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारणार असून ह्या प्रकल्पासाठी सुमारे ४७२ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. महानिर्मितीद्वारे राहुरी कृषी विद्यापीठास वीज बिल कमी करण्यासाठी ५०० किलोवॅट क्षमतेचे सौर संच उभारणी करून देण्यात येणार आहे. महाऊर्जा, पुणे यांचेशी १२० मेगावॅट क्षमतेचे सौर-पवन सहस्थित प्रकल्प विकसित करण्यात येतील. एकूण ५१८ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. महाराष्ट्रात उदंचन पद्धतीच्या जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मोठा वाव असून मे. एस जे व्ही एन मर्यादित यांचे संयुक्त उद्यमाद्वारे सुमारे ५,००० मेगावॅटचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. यासाठी सुमारे रु. ४० हजार कोटी इतकी गुंतवणूक अपेक्षित आहे. या तिन्ही सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्यामध्ये एकूण ५,२२० मेगावॅट स्थापित विद्युत क्षमता वाढ होणार असून एकत्रित सुमारे रु. ४० हजार ९९० कोटी इतकी गुंतवणूक अपेक्षित आहे. एकूणच या तिन्ही करारांद्वारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात टप्प्याटप्प्याने ६,००० रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *